Paris Olympics 2024 Nada Hafeez: सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची (Paris Olympics 2024) स्पर्धा आहे. दररोज विविध खेळाडू आपल्या देशासाठी मेडल जिंकवून देण्यासाठी प्रतिस्पर्धींसोबत दोन हात करताना दिसून येतंय. याचदरम्यान जगाला भावूक करणार क्षण लोकांनी ऑलिम्पिकमध्ये अनुभवला. इजिप्तची नादा हाफिझ ही सात महिन्यांच्या गर्भवती महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली.
पहिली फेरी जिंकत तिने ऑलिम्पिक दावेदारी कायम ठेवली. जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला नादा हाफिझने 15-13 अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर तिचा सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंगविरूद्ध झाला. ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.
नादा हाफिझची भावून पोस्ट-
सामना झाल्यानंतर नादा हाफिझ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली की, सात महिने गरोदर असताना आपण पोटातल्या बाळासह तलवारबाजी स्पर्धेला उतरलो, लोकांना आम्ही दोनच स्पर्धक दिसत असलो तरी प्रत्यक्षात तीन होतो असं तिने स्वत:च स्पर्धेनंतर तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं. गर्भधारणा स्वतःच कठीण असते, परंतु जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी लढणे खूप कठीण होते, असंही नादा हाफिझ म्हणाली.
नादाने पती आणि कुटुंबाचे मानले आभार-
नादा हाफिजने तिचे पती आणि कुटुंबाचे आभार मानले, ज्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. नादा तिच्या पोस्टद्वारे म्हणाली की, मी हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहित आहे की मला शेवटच्या 16 मध्ये माझे स्थान मिळाले याचा मला अभिमान आहे. मी नशीबवान आहे की मला माझ्या पती आणि माझ्या कुटुंबाचा विश्वास मिळाला, ज्यामुळे मी हे करू शकले. येथे पोहोचा हे स्पेशल ऑलिम्पिक वेगळे होते.
पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यात पराभव-
पहिला सामना जिंकल्यानंतर नादा हाफिजने दुसरा सामना गमावला.नादा हाफिजने तिच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 असा पराभव केला. पण दुसऱ्या सामन्यात तिला कोरियाच्या जिओन ह्योंगकडून 7-15 असा पराभव पत्करावा लागला. नादा हाफिजची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती.
संबंधित बातम्या:
Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा