Olympics 2032: ऑलिम्पिक गेम्स 2032 ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बुधवारी याची अधिकृत घोषणा केली. आयओसीच्या 138 व्या मोसमात 2032 उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी ब्रिस्बेनला मिळाली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोनदा ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे. यात 1956 मध्ये मेलबर्न आणि 2000 सिडनी ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले होते.


2017 मध्ये, आयओसीने 2024 ऑलिम्पिकचे होस्टिंग पॅरिसला आणि 2028 ऑलिम्पिकचे आयोजन लॉस एंजेलिसकडे दिले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आयओसीने सांगितले की 2032 ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ब्रिस्बेन योग्य उमेदवार आहेत. वास्तविक ब्रिस्बेनला आयओसीतर्फे सर्वाधिक पसंती देण्यात आलेली असूनही कतारने 2032 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा दर्शविली होती. आयओसीच्या 15 कार्यकारी मंडळाने 10 जून रोजी ब्रिस्बेनला निवडणुकीसाठी एकमेव उमेदवार म्हणून मान्यता दिली.






यावेळी जपानची राजधानी टोकियो येथे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होईल आणि 8 ऑगस्ट रोजी संपेल. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 127 भारतीय खेळाडूंनी पदक जिंकण्याची आशा दाखवली आहे. टोकियोनंतर 2024 मध्ये फ्रान्सच्या पॅरिस येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल.


2032 मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करुन ऑस्ट्रेलिया रेकॉर्ड करणार
तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार्‍या अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया दुसरा देश होईल. यापूर्वी 1956 मध्ये मेलबर्न आणि 2000 मध्ये सिडनी शहरात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. इंडोनेशिया, हंगेरीची राजधानी बुडापेस्ट, चीन, कतारचा डोहा आणि जर्मनीचा रुहर व्हॅली विभाग या शहर आणि देशांनी 2032 ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात रस दाखवला होता.