Tokyo Olympic : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचं नाव आज घराघरात पोहोचलंय. अनेकाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला नीरज झळकतोय. कारण त्याने केलेली कामगिरीरी तितकीच मोठी आहे. तब्बत 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचं राष्ट्रगीत आज ऐकू आलं आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी हा क्षण अविस्मरणीय आणि अभिमानास्पद आहे. नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्ण पदकं जिंकलं आणि आता एका व्हिडीओमुळे त्यानं भारतीयांची मनंही जिंकली आहेत. 


अनेकदा उत्साहाच्या भरात आपण भान विसरुन जातो. मात्र नीरजने विजयाचा आनंद साजरा करतेवेळी भारताची आन, बान, शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा खांद्यावर घेतला होता. मात्र विजयाचं सेलिब्रेशन करताना आपल्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीचं भान त्याला होतं. सेलिब्रेशनच्या नादात राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्वोतपरी काळजी नीरजने घेतली. व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे नीरज दुसऱ्या खेळाडूचं अभिनंदन करत त्याला आलिंगन दिलं. त्यानंतर आपल्या खांद्यावर असलेला तिरंगा हातात घेत सन्मानपूर्वक त्याची घडी घातली. ज्या भारत देशासाठी नीरजने सुवर्ण पदक जिंकल त्या देशाच्या अस्मितेचं प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान नीरजने राखला.






टोकियो आलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सूवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सूवर्ण पदकाची  कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. 


नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ तब्बल 13 वर्षानंतरचं संपुष्टात आला. ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत. 


संबंधित बातम्या