Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची  कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. 


याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.


ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर सुवर्ण पदक


ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. याआधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत. 


Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल?


भारताच्या झोळीत एकूण सात पदकं


टोकियो आलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताचं पदकाचं खातं उघडलं होतं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटमध्ये कांस्य पदक जिंकलं. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने देखील दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव पटकावलं. लवलीना बॉक्सिंमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर बनली. 


भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा!


त्यानंतर रवी दहियाने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरं रौप्य पदक जिंकून दिलं. पैलवान रवी दहियाने 57 किलो फ्री स्टाईल गटात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत 41 वर्षांंनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून दिलं. आज नीरज चोप्राने सुवर्ण पदक आणि  बजरंग पुनियाने  कुस्तीत भारताला कांस्य पदक जिंकून दिलं आहे.