Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : रौप्य पदकाने सुरुवात, तर सुवर्ण पदकाने शेवट; टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी
नीरज चोप्रा : भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तब्बल 13 वर्षानंतरचं म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. (photo tweeted by @imranirampal)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीराबाई चानू : मीराबाई चानून ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं. यापूर्वी वेटलिफ्टींगमध्ये 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते. (photo tweeted by @mirabai_chanu)
रवी कुमार दहिया : रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. झावूने रवी कुमारवर 7-4 असा विजय मिळवला. (photo tweeted by @mirabai_chanu)
पुरुष हॉकी संघ : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये, पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. (photo tweeted by @TheHockeyIndia)
पी व्ही सिंधू : पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पी व्ही सिंधूने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने चिनी खेळाडू बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे. (photo tweeted by @Pvsindhu1)
लवलीना बोरगोहेन : महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. मात्र सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली आणि लवलीनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. (photo tweeted by @LovlinaBorgohai)
बजरंग पुनिया : कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली. (photo tweeted by @RCBTweets)