Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. कोरियाच्या ओह ये जिन हिने सुवर्णपदक पटकावलं आहे.
कांस्य पदक जिंकल्यानंतर काय म्हणाली?
मला खूप छान वाटतंय. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कांस्य पदक जिंकले असले तरी मला आनंद आहे की मी देशासाठी जिंकू शकले. हे पदक सर्वांचं आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार असं मनू भाकर म्हणाली. कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, तिने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मनू भाकर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.
फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.
नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
भारतीय खेळाडूंचे पुढील सामने-
4.30 वाजता, टेबल टेनिस
राऊंड ऑफ 64 टेबल टेनिसमध्ये मानिका बात्रा ही भारतातर्फे खेळेल.
5.45 , तिरंदाजी
भारताला महिला तिरंदाजांकडून देखील पदकाची आशा आहे. उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत खेळतील.
7.45 वाजता, तिरंदाजी
दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांना उपांत्यपूर्वी फेरीत यश मिळाल्यास उपांत्य फेरीचा सामना सायंकाळी 7.45 वाजता होईल.
8.00 वाजता बॅडमिंटन
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता पुरुष एकेरी ग्रुप स्टेजमध्ये एचएस प्रणॉयचा सामना असेल.
8.18 वाजता, तिरंदाजी
दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिरंदाजीत उपांत्य फेरीनंतर कांस्य पदकाची लढत रात्री 8.18 वाजता होईल. 8.41 वाजता तिरंदाजीची अंतिम फेरी होईल.
संबंधित बातमी:
Olympics 2024: रमिता जिंदालने रचला इतिहास; 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश