पॅरीस : सध्या पॅरेसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत गेल्या वर्षापेक्षा सरस कामगिरी करण्याचे भारताचे लक्ष आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. भारताच्या मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत अंतिम फेरीत धडक मारलीय. भारताच्या एका महिला नेमबाजानं तब्बल 20 वर्षांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. पण मनू भाकरनं एअर पिस्टल नेमबाजीचं पदक जिंकल्यास, ती ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरणार आहे. त्यामुळे आज तिच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कोण आहे मून भाकर?
भारत आज मून भाकरच्या रुपात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपलं खातं उघडू शकतो. तिने 10 मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.
नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
मनूला सुवर्ण मिळणार का? संपूर्ण भारताचे लक्ष
2021 साली झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण आता तीन वर्षांनी तिने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठलेली आहे. त्यामुळे आज ती नेमकी काय कामगिरी करणार? भारताला मनू भाकरच्या रुपात पहिले सुवर्ण मिळणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये कमाल
दरम्यान, पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी नेमबाजीसह अन्य स्पर्धांतही चांगली कामगिरी केली. भारताने 27 जुलै रोजी टेबल टेनिस, बॅडमिंटन, हॉकी या खेळ प्रकारांत विजय मिळवला. हॉकीमध्ये भारताने प्रतिस्पर्धी न्यूझिलंडला 3-2 अशा फरकाने पराभूत केलं. टेबल टेनिस या खेळ प्रकारात हरमीत देसाईने विजयी कामगिरी केली.
हेही वाचा :
मोठी बातमी! महिला आशिया चषकाच्या अंंतिम लढतीच्या वेळेत बदल, जाणून घ्या भारत-श्रीलंका फायनल मॅच कधी?