Manu Bhaker Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. आज दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. याआधी रविवारी (28 जुलै) मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 






वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टलमध्येही मनू भाकरचं कांस्य पदक


पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. 28 जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती. 


नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण


जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.


कोण आहे मनू भाकर?


22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.


चौथ्या दिवशी भारताला दुसरे पदक-


आज म्हणजेच 30 जुलै, मंगळवार पॅरिस ऑलिम्पिकचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी भारताला दुसरे पदक मिळाले. ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पहिले पदक जमा झाले होते. आतापर्यंत भारताला फक्त कांस्य पदक मिळाले आहे, त्यामुळे आता चाहत्यांना भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकाची आशा लागली आहे.


संबंधित बातम्या:


Paris Olympics 2024: भारताने आज पुन्हा कांस्य पदकावर कोरलं नाव; नेमबाज मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने रचला इतिहास


Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा