Tokyo Paralympics : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती. 


Avani Lekhara wins Gold : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी; 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक






टोकियो परालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखारा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, काल दिवसभरात दोन रौप्य पदकं भारताच्या खात्यात जमा झाली होती.  


योगेशच्या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, योगेश कठुनिया यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. योगेशनं देशासाठी रौप्य पदक मिळवल्याचा आनंद आहे. त्याचे यश निश्चितच अनुकरण करण्यासारखे आहे आणि ते नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. योगेशचं खूप अभिनंदन आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.