Commonwealth Games 2022: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (Indian Olympic Association) बर्मिंगहॅम येथे 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. 


बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी सदस्यांची घोषणा करताना आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले की, "आम्ही आमचं सर्वात उत्कृष्ट खेळाडू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पाठवत आहोत.  नेमबाजी स्पर्धेत भारतानं आपला ठसा उमटवला आहे. परंतु, बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेचा भाग नाही. भारतीय खेळाडू मागच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा आणखी चांगली कामगिरी करून दाखवतील, असा आमचा विश्वास आहे. गेल्या वेळी गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या होत्या, जिथे भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. 


ऑलिम्पिक पदकविजेते भारतीय सदस्यांचा भाग
कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, मनिका बत्रा, विनेश फोगट, हिमा दास आणि अमित पंघल हे देखील या संघात आहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना भारतीय संघाचे संघप्रमुख बनवण्यात आलंय. 


15 खेळांमध्ये सहभागी होतील भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणार आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडेल. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी असेल.


हे देखील वाचा-