Alica Schmidt Hook Up With Everyone Fact Check: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची स्पर्धा (Paris Olympics 2024) संपुष्टात आली आहे. 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत ही ऑलिम्पिकची स्पर्धा पॅरिसमध्ये खेळवण्यात आली. अमेरिकेने एकूण 126 पदके जिंकली असून यामध्ये 40 सुवर्णपदक, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकली. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनने एकूण 95 पदके जिंकली आहेत. यामध्ये 40 सुवर्ण, 27 रौप्य आणि 24 कांस्य पदक जिंकली आहे. याचदरम्यान ऑलिम्पिकमधील एका महिला खेळाडूने अनेक खेळाडूंसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. 


जर्मनीची ॲलिसा श्मिट (Alica Schmidt) पॅरिस ऑलिंपिकमध्ये जर्मन महिलांच्या 4x400 मीटर रिले टीमचा एक भाग होती. तथापि, ॲलिसा श्मिटचा समावेश असलेला जर्मन संघ 4x400 मीटर रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. जर्मन संघाने 3:26.95 मिनिटांत शर्यत पूर्ण केली. या वेळेसह, जर्मन संघ 7 व्या स्थानावर राहिला, तर शीर्ष 4 संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. जर्मनीची ॲथलीट अॅलिसा श्मिट हिचे ऑलिम्पिकमधील अनेक खेळाडूंसोबत शारीरिक संबंध होते, असा दावा सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. 


व्हायरल दाव्यामागील नेमकं सत्य काय?


ॲलिसा श्मिटने अनेक खेळाडूंसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दाव्यात कोणतेही तथ्य नाही. सदर बाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात सुंदर महिला खेळाडू असल्याने अॅलिस श्मिटनबाबत असा खोटा दावा करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. 


ॲलिसा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध


ॲलिसा श्मिट सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. सुमारे 5.7 दशलक्ष लोक अॅलिसाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अॅलिसाने पॅरिस ऑलिम्पिकमधील अनेक फोटो शेअर केले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याने ती खूप आनंदी दिसत होती. एका पोस्टद्वारे त्यांनी पॅरिसला पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "जेव्हा स्वप्ने सत्यात उतरतात."


लिंग वादात अडकलेल्या इमाने खलीफ सुवर्णपदक जिंकलं-


अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने (Imane Khelif) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटात चीनच्या यांग लिऊचा पराभव करून ही कामगिरी केली. या विजयासह इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान इमाने खलीफवरुन गेल्या दिवासांपासून वाद रंगला होता.


संबंधित बातमी:


पॅरिस ऑलिम्पिकमधील 5 महिला खेळाडूंच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ; बॉलिवूड-हॉलिवूडमधील अभिनेत्रीही पडतील फिक्या