Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother: नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि मनू भाकर (Manu Bhaker) भारतात परतल्यानंतर चर्चेचा विषय बनले आहेत. वास्तविक, मनू भाकर आणि नीरज चोप्राचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत, ज्यामुळे नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांची प्रेमकहाणी सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. 


एका व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात घेत त्यांच्या डोक्यावर ठेवला. तसेच बराच वेळ दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. मात्र आता मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात नेमकं काय बोलणं झालं?, याबाबत सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दावा करण्यात आला आहे. 


मनू भाकरची आई अन् नीरज चोप्रा यांच्यातील संवाद-


मनू भाकरची आई-  तू टेन्शन घेणार नाही, अशी शपथ घे. (असं म्हणत मनू भाकरची आई नीरजचा हात घेऊन डोक्यावर ठेवते) विश्रांती घे आणि नंतर अधिक मेहनत कर.


मनू भाकरची आई अन् नीरज चोप्राचा व्हिडीओ-






दोघांनी पटकावली पदके-


नीरज चोप्रा आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. यासह, एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, नीरज चोप्रा 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकत भारताला सहावे पदक मिळवून दिले. 


भारताने एकूण 6 पदके जिंकली-


पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत खेळवण्यात आली.  या स्पर्धेत जगभरातील 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताकडून एकूण 117 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले. 


संबंधित बातमी:


विनेश फोगाट पॅरिसहून भारतासाठी रवाना; पहिला व्हिडीओ आला समोर, पदक मिळणार की नाही?, आज निर्णय