Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
पॅरिस ऑलिम्पिकमधील 5 महिला खेळाडूंच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ; बॉलिवूड-हॉलिवूडमधील अभिनेत्रीही पडतील फिक्या
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची 11 ऑगस्ट रोजी सांगता झाली. 26 जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या स्पर्धेत 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये 32 विविध क्रीडा प्रकारात एकूण 329 पदकं देण्यात आली. (Paris Olympics 2024)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला खेळाडूंच्या सौंदर्याची खूप चर्चा झाली. अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यांना पाहून सगळेच त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री त्यांच्यासमोर अपयशी ठरतील, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. (Paris Olympics 2024)
एलेना कुलिचेन्को- सायप्रसच्या एलेना कुलिचेन्कोच्या सौंदर्याची पॅरिसपासून जगभरात चर्चा झाली. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले. उंच उडीत अंतिम फेरी गाठल्यानंतर तिला पराभव पत्करावा लागला होता. पदक न मिळाल्याने ती खूपच निराश झाली होती.(Paris Olympics 2024)
लुआना अलोन्सो- पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सोला तिच्या सौंदर्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. लुआना अलोन्सोला पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. याचे कारण म्हणजे ती खूप सुंदर होती, त्यामुळे इतर खेळाडूंचे लक्ष विचलित होत होते. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारही तिचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.(Paris Olympics 2024)
इवा स्वबोडा- पोलंडची इवा स्वबोडाही खूप सुंदर आहे. इवा स्वबोडाने 100 मीटर शर्यतीत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र ती पदक जिंकू शकली नाही.(Paris Olympics 2024)
झेहरा गुनेस- तुर्कीच्या व्हॉलीबॉल संघाची खेळाडू झेहरा गुनेसने देखील तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लावले होते. ब्राझीलने कांस्य पदकाच्या लढतीत तुर्की संघाचा पराभव केला होता.(Paris Olympics 2024)
एलिसा न्यूमन- कॅनडाच्या एलिसा न्यूमनने पोल व्हॉल्टमध्ये देशासाठी कांस्य पदक जिंकले. सर्वजण एलिसाच्या सौंदर्याचे कौतुक करत होते. (Paris Olympics 2024)