बंगळूर : आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये रोमांचक सामन्यांचा टप्पा सुरूच आहे. आज (26 ऑक्टोबर) विश्वचषकात श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. दोन संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आहे. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 1-1 सामने जिंकता आले आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या. तब्बल सहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. 






इंग्लंडला झटपट पाच धक्के दमदार सुरुवात करताना 27 वर्षांचा इतिहास कायम ठेवण्यासाठी दमदार सुरुवात केली आहे. 1996 पासून इंग्लंडला श्रीलंकेचा पराभव करता आलेला नाही. 






इंग्लंडच्या विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि त्यांचा संपूर्ण संघ 33.2 षटकांत 156 धावांत गारद झाला. बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण सात विकेट घेतल्या. लाहिरू कुमाराने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिथा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.






या विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंकेची कामगिरी काही विशेष झाली नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून, तीनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. श्रीलंकेचा एकमेव विजय नेदरलँडविरुद्ध होता. इंग्लंडने बांगलादेशला हरवून विजयाची चव चाखली होती. आता हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.






इतर महत्वाच्या बातम्या