नवी दिल्ली : फिटनेस आणि खेळीने जगातील सर्वोत्तम अॅथलिटपैकी एक असलेला टीम इंडियाचा किंग विराट कोहली किती कुटुंबवत्सल आहे हे त्याच्या वर्तनातून आणि बोलण्यातून समोर येत असते. रेकॉर्डवर रेकॉर्ड करत असलेला एक महान खेळाडू असण्यासोबतच कोहली तितकाच महान व्यक्ती सुद्धा आहे. हे समजून घेण्यासाठी आपण त्याला आणि त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते पाहू शकतो. विराट कोहलीने नुकतेच त्याच्या पहिल्या प्रेमाचे नाव सर्वांसमोर उघड केले. 


आईची काळजी घेणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे


स्टार स्पोर्ट्सवर आईशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, 'माझ्या आईची काळजी घेणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तिचा आनंद माझ्यासाठी सर्वस्व आहे. ज्या छोट्या गोष्टी त्यांना आनंदी ठेवतात, मलाही आनंदी ठेवतात. विराटच्या या वक्तव्यावरून तो त्याच्या आईच्या किती जवळ आहे आणि त्याच्यासाठी तिच्या आनंदापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही हे दिसून येते.विराट कोहलीच्या आईचे नाव सरोज कोहली आहे. त्या दिल्लीत राहतात. क्रिकेटमुळे अनेकदा दूर राहणारा कोहली आपल्या आईला भेटण्यासाठी नेहमी दिल्लीत येतो.






तंदुरुस्त कोहलीची आई चिंतेत


विराट कोहली एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता की, 'माझ्या फिटनेससाठी जगभरातून कौतुक होत असताना, माझ्या आईला वाटतं की मला काही आजार आहे आणि त्यामुळे मी बारीक होत आहे. तो म्हणाला होता की त्याची आई त्याला अनेकदा फोन करते आणि विचारते की तू जेवलास की नाही? आजकाल कमी खातोय का (हसत) खरं तर आई आणि मुलाचं नातं असं असतं की दोघांनाही एकमेकांची काळजी असते.






वर्ल्ड कपमध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये 


2023 च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची बॅट जोरदार बोलत आहे. कोहलीने 5 सामन्यात एक शतक आणि 3 शतकांच्या मदतीने 354 धावा केल्या आहेत. कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवावा आणि आगामी मोठ्या सामन्यांमध्ये अशीच कामगिरी करावी अशी टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. भारताला जगज्जेते व्हायचे असेल, तर कोहलीच्या बॅटने असेच चालत राहणे खूप गरजेचे आहे.