चेन्नई : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने पहिल्याच वर्ल्डकपच्या सामन्यात एक आगळावेगळा पराक्रम आपल्या नावे केला. आज भारताविरुद्धच्या (India vs Australia) सलामीच्या लढतीत वाॅर्नर (David Warner ODI Record) 41 धावांची खेळी करून तंबूत परतला. मात्र, त्याच्या या खेळीनंतर मोठा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. डेव्हिड वॉर्नर हा वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यांमध्ये वेगाने 1000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत दोन दिग्गजांन मागे टाकत ही कामगिरी केली. त्याने सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांना मागे टाकत पराक्रमा आपल्या नावे केला.  


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी डेव्हिड वॉर्नर मिशन मार्श मैदानात उतरले. मात्र मार्शला तिसऱ्याच षटकात बुमराहने शून्यावर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नर  आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमाने फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. वॉर्नर  41 धावांवर बाद झाला. कुलदीपने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे भारताला सलामाची जोडी स्वस्तात बात करण्यात यश मिळाले. 


 27 वर्षांची 'ती' परंपरा टीम इंडिया आज खंडित करणार की नाही?


दुसरीकडे, सर्वाधिक वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने (They won their first match of the World Cup in 6 straight editions) 1996 पासून ते आतापर्यंत कधीच वर्ल्डकपची सलामीची मॅच गमावलेली नाही. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चालत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. त्यामुळे अशा बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर आज टीम इंडिया 27 वर्षांची पहिल्या लढतीमधील विजयी मालिका मोडित काढणार की ऑस्ट्रेलिया बाजी मारणार? याचे उत्तरही आज मिळणार आहे. यापूर्वी 1996 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर आजवरच्या सलग सहा वर्ल्ड कपमध्ये आपली पहिली मॅच जिंकूनच दमदार सलामी दिली आहे. यामध्ये 1999, 2003, 2007, 2011, 2015, 2019 अशा सलग सहा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला मात दिली आहे. 


नुकत्याच पार पडलेल्या मालिकेमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) धूळ चालली होती. त्यामुळे एकंदरीत दोन्ही संघांना एकमेकांच्या परिस्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारते याकडे आता लक्ष आहे. दोन्ही संघांची वर्ल्डकपमधील कामगिरी तशी दमदारच राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातील वर्ल्डकपच्या 18 सामन्यांमधील 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने 22 सामन्यांमधील 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या