Effects of Teasing in Kids : जेव्हा मुलांची छेड काढली जाते, तेव्हा काही मुले सहजपणे त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा थेट उत्तर देतात. मात्र, काही मुलं अशी असतात जी दुसऱ्यांचं बोलणं थेट मनावर घेतात. ते या गोष्टीचा इतका विचार करू लागतात की त्यांना अनेकदा ताण येतो. मुलांच्या वाढत्या वयात कोणत्याही प्रकारची नकारात्मक वागणूक त्यांच्या भावी आयुष्यावर वाईट परिणाम करू शकते. मात्र, मुलांना घराबाहेरच छेडछाडीचा सामना करावा लागतो का? तर, नाही. अनेकदा घरातील सदस्यांच्या वागणुकीचाही परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. उंची, बारीकपणा, दिसणे या अशा गोष्टी आहेत, ज्याची मुले बाहेरच्या लोकांशी आणि नंतर घरातील लोकांशी सामना करताना काळजी करतात. यामुळे त्यांना नैराश्य येतं. यासाठी छेडछाडीची सवय गांभीर्याने घेणं आणि त्याच्या कारणांबरोबरच परिणामांकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
छेडछाड आपल्या अंतर्गत कमतरता दर्शवते
एखाद्याची छेडछाड करणे म्हणजे तुमच्यातील कमतरता दर्शवणे. जर तुम्हाला एखाद्याला त्रास देण्यात आनंद वाटत असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे. तुम्हाला कोणाच्याही भावनांची पर्वा नाही हे यातून स्पष्ट होते. ही परिस्थिती समजून घेऊन त्यात सुधारणा करण्याचीही गरज आहे.
मुलामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते
तज्ज्ञांच्या मते, मुलांना कोणत्याही गोष्टीबद्दल चिडवल्याने त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना निर्माण होते. न्यूनगंडामुळे त्यांच्यात आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांचे दिसणे त्यांच्या अभ्यासात आणि करिअरमध्ये अडथळा ठरत नसले तरी ते मानसिकदृष्ट्या खूपच कमकुवत होतात, त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावरही दिसून येतो.
सायबर बुलिंगचा प्रभाव
ज्या मुलांना अनेकदा या परिस्थितीचा सामना करावा लागतो ते हळूहळू लोकांपासून वेगळे होऊ लागतात. त्यांना स्वतःपुरतेच राहायला आवडते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आजकाल मुलांना बुलिंग केलं जातं. त्यांंच्या भावनांचा गैरफायदा घेतला जातो. त्यांना फसवलं जातं. त्यामुळे मुलांना सायबर बुलिंगची भीती नेहमीच असते. मित्र बनून त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेणे आणि नंतर त्यांना त्रास देणे आणि ब्लॅकमेल करणे असे प्रकार सध्या अगदी सर्रासपणे होताना दिसतायत यासाठी पालकांनीही वेळीच मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :