IND Vs AUS, Match Highlights : भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय

IND vs AUS World Cup 2023 LIVE Score: चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलामीची लढाई होणार आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 08 Oct 2023 09:51 PM
भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय

भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय... केएल राहुलने षटकार मारत भारताला मिळवून दिला विजय

भारताला चौथा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली 85 धावांवर बाद झाला आहे. भारत 4 बाद 167 धावा... विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. भारताला विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 

भारत विजयाच्या समीप

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दीडशतकी भागिदारीच्या जोरावर भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. भारताला विजयासाठी 35 धावांची गरज

विराट-राहुलची झुंजार खेळी

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. भारत तीन बाद 128 धावा.... विराट कोहली 65 आणि राहुल 56 धावांवर खेळत आहेत. 

कोहलीनंतर के. एल. राहुलचेही दमदार अर्धशतक...कोहलीसोबत टीम इंडियाच्या डावाला दिला आकार...

कोहलीनंतर के. एल. राहुलचेही दमदार अर्धशतक...कोहलीसोबत टीम इंडियाच्या डावाला दिला आकार...

विराट कोहलीचे झुंझार अर्धशतक... 75 चेंंडूत साकारली महत्त्वाची खेळी...

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंझार अर्धशतक झळकावले आहे.. 75 चेंंडूत त्याने ही खेळी साकारली आहे. या खेळीत त्याने फक्त 3 चौकार लगावले आहेत. 

विराट-राहुलने डाव सावरला

दोन धावांवर तीन विकेट, अशा बिकट स्थितीमधून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला आहे. 19.3 षटकानंतर भारत तीन बाद 77 धावा... राहुल 37 आणि विराट कोहली 37 धावांवर खेळत आहेत.

विराट-राहुलने डाव सावरला, भारताचे अर्धशतक

कठीण स्थितीत विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारीही झाली आहे. विराट कोहली 31 तर राहुल 18 धावांवर खेळत आहे. 

पॉवरप्ले संपला, ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

पहिल्या दहा षटकांच्या पॉवरप्लेवर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले आहे. ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या तीन फलंदाजांना खातेही उघडू दिले नाही. दहा षटकानंतर भारताने तीन बाद  27 धावा केल्या आहेत. विराट कोहली 17 तर राहुल सात धावांवर खेळत आहे.

विराट कोहलीचा झेल सुटला, मिचेल मार्शची गचाळ फिल्डिंग

ऑस्ट्रेलियाकडून मोठी चूक... विराट कोहलीचा सोपा झेल सुटला... मिचेल मार्शची गचाळ फिल्डिंग

विराट कोहलीचा जबराट चौकार

मिचेल स्टार्कच्या 50 विकेट

मिचेल स्टार्कने विश्वचषकात 50 विकेट पूर्ण केल्या. 





भारताची खराब सुरुवात... पहिल्या दोन षटकात गमावले तीन विकेट्स...

भारताची खराब सुरुवात... पहिल्या दोन षटकात गमावले तीन विकेट्स.., ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर भोपळाही न फोडता बाद....

भारतीय संघ विश्वचषकाचा विजयी शुभारंभ करण्यास सज्ज

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फ्लॉप

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद करत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पहिली विकेट झटपट गेल्यानंतर डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या अनुभवी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्या घेत फलंदाजी सुरु ठेवली. ही जोडी धोकादायक ठरते की काय असे वाटत असतानाच कुलदीप यादवने डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यामध्ये 69 धावांची भागिदारी केली. डेविड वॉर्नर याने 52 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नरने 6 चौकार ठोकले. वॉर्नरपाठोपाठ स्मिथही तंबूत परतला. जाडेजाच्या जबरदस्त चेंडूवर स्मिथ त्रिफाळाचीत झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. स्मिथने 71 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये स्मिथे 5 चौकार लगावले. 


मार्नस लाबुशेन याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही. मार्नस लाबुशेन याने 41 चेंडूत एका चौकारासह 27  धावांचे योगदान दिले. अनुभवी ग्लेन मॅक्सवेल यालाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल अवघ्या 15 धावांवर कुलदीप यादवचा शिकार ठरला. अॅलेक्स कॅरी याला तर खातेही उघडता आले नाही. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर कॅरी गोल्डन डकचा शिकार ठरला. कॅमरुन ग्रीनला आठ धावांवर अश्विनने तंबूत धाडले. पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पहिला षटकार मारला. पण कमिन्सलाही मोठी खेळी करता आली नाही. कमिन्सने 24 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांचे योगदान दिले. मिचेल स्टार्कने अखेरीस 28 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 199 धावांपर्यंत पोहचवले. 

वेगवान मारा कसा?

जसप्रीत बुमराहने 10 षटकात 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

फिरकी त्रिकुटाचा भेदक मारा -

भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या.


रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा मध्यक्रम उखडून टाकला. रविंद्र जाडेजाने 10 षटकात फक्त 28 धावा खर्च करत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. जाडेजाने दोन षटकेही निर्धाव टाकली. जाडेजाने आपल्या दहा षटकांमध्ये स्टिव्ह स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले.  


कुलदीप यादव यानेही अचूक टप्प्यावर मारा करत कांगारुंना रोखले. कुलदीप यादवने 10 षटकात 42 धावा खर्च केल्या. यादमर्यान त्याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीपने धोकादायक डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मोक्याच्या क्षणी बाद केले. 


वनडेमध्ये कमबॅक करणाऱ्या अश्विन यानेही भेदक मारा केला. अश्विनच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चाचपडत होते. अश्विनने 10 षटकात 34 धावा खर्च करत एक विकेट घेतली. अश्विन याने कॅमरुन ग्रीनला तंबूचा रस्ता दाखवला. अश्विन याने एक षटक निर्धावही फेकले. 

शिखर धवनने घेतला सामन्याचा आनंद

भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान

भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडाली. निर्धारित 49.3 षटकात ऑस्ट्रेलियाने 199 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. तर 9 फलंदाज 30 धावसंख्या ओलांडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी संघर्ष केला, पण मोठी खेळी करता आली नाही. स्मिथने 46 तर वॉर्नरने 41 धावांची खेळी केली. भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या. तर कुलदीपने दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांत आटोपला

ऑस्ट्रेलियाचा डाव 199 धावांत आटोपला

ऑस्ट्रेलियाला नववा धक्का

ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, अॅडम जम्पा 6 धावांवर बाद

बुमराहचा तिखट मारा

जसप्रीत बुमराहने 10 षटकात 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.

फिरकी त्रिकुटाचा भेदक मारा

भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या.

चेपॉकवर चाहत्यांचा निळा समद्र

जाेडजाची भेदक गोलंदाजी

रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा मध्यक्रम उखडून टाकला. रविंद्र जाडेजाने 10 षटकात फक्त 28 धावा खर्च करत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. जाडेजाने दोन षटकेही निर्धाव टाकली. जाडेजाने आपल्या दहा षटकांमध्ये स्टिव्ह स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले. 

ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला आणखी एक धक्का... कमिन्स बाद

ऑस्ट्रेलियाचा पहिला षटकार

40 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिला षटकार मारला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने कुलदीप यादवला षटकार मारला. ऑस्ट्रेलिया सात बाद 152 धावा

ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का

अश्लिनच्या चेंडूवर धोकादायक कॅमरुन ग्रीन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

कुलदीप यादवने मॅक्सवेलला पाठवले तंबूत

ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडत कुलदीपने ऑस्ट्रेलियाला दिला सहावा धक्का....  मॅक्सवेल 15 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया 35.5 षटकानंतर 6 बाद 140 धावा

भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

भारताच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले आहे. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. 19.4 षटकांपासून ऑस्ट्रेलियाला चौकार मारता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावात एकही षटकार मारता आला नाही. 





जाडेजाचा भेदक मारा 

रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलिया अडकला. रविंद्र जाडेजाने 6 षटकात 18 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जाडेजाने जम बसलेल्या स्मिथ आणि लाबुशेन यांना तंबूत धाडले. अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही.





IND vs AUS LIVE Score: रविंद्र जाडेजा ऑन फायर, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का

रविंद्र जाडेजाने अॅलेक्स कॅरीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. जाडेजाची तिसरी विकेट... ऑस्ट्रेलियाचे 119 धावांत पाच विकेट तंबूत

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

जाडेजाने लाबुशेन याला बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. 119 धावांत ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज तंबूत परतले आहेत.  लाबुशेन 29 धावांवर बाद झाला. 

ऑस्ट्रेलियाचा संघर्ष

भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहे. मागील 10 षटकांपासून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चौकार मारता आला नाही. 

मोठा अडथळा दूर, स्मिथ बाद

रविंद्र जाडेजाने स्मिथचा त्रिफाळा उडवत सर्वात मोठा अडथळा दूर केला. स्मिथला 46 धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलिया तीन बाद 110 धावा. 

ऑस्ट्रेलियाचे शतक फलकावर

24 षटकात ऑस्ट्रेलियाने दोन विकेटच्या मोबदल्यात 100 धावा केल्या आहेत. स्मिथ आणि लाबुशेन मैदानावर आहेत. 

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

डेविड वॉर्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने वॉर्नरला तंबूत पाठवले. 

कगिसो रबाडाच्या वडिलांचा टीम इंडियाला सपोर्ट

ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

मिचेल मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव वॉर्नर आणि स्मिथ यांनी सावरला आहे. 14 षटकानंतर ऑस्ट्रेलियाने एक बाद 66 धावा केल्या आहेत. वॉर्नर 35 तर स्मिथ 31 धावांवर खेळत आहे.

विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक झेल घेणारे फिल्डर्स - 

विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक झेल घेणारे फिल्डर्स - 


विराट कोहली 27 डावात 15 झेल


अनिल कुंबळे 18 डावात 14 झेल


कपिल देव 25 सामन्यात 12 झेल


सचिन तेंडुलकर 44 डावात 12 झेल


विरेंद्र सेहवाग 22 सामन्यात 11 झेल


अझहर 19 डावात 11 झेल


झहीर खान 23 डावात 10 झेल


सुरेश रैना 12 डावात 10 झेल


के श्रीकांत 22 डावात 9 झेल


उमेश यादव 8 डावात 8 झेल

वॉर्नरच्या 1000 धावा

विश्वचषकाच डेविड वॉर्नरने एक हजार धावांचा टप्पा पार केला. 

ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक

फलकावर ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक झळकले आहे. मिचेल मार्श बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव संभाळला.

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. विराट कोहलीने मिचेल मार्शचा जबराट झेल घेतला. 

डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श फलंदाजीसाठी मैदानात

डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी तयार... 


भारताची विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 


 



 डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, एडम जम्पा.

भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

भारताची प्रथम गोलंदाजी

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात होणार नाणेफेक.. 

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरोधात रेकॉर्ड - 

विराट कोहलीने वनडे फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 45 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये   53.1 च्या शानदार सरासरीने 2,228 धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीने आठ शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकाविरोधात ठोकल्या आहेत. श्रीलंकाविरोधात कोहलीने 50 सामन्यात 62.7 च्या सरासरीने 2506 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजविरोधात कोहलीने 41 सामन्यात 66.55 च्या सरासरीने 2261 धावा चोपल्या आहेत. म्हणजेच, वनडेमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाविरोगात तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत. विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

विराट की स्मिथ.. कोण वरचढ

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून किंग कोहलीचं कौतुक

भारतीय संघ चेपॉकवर दाखल

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी नाणेफेक होईल. 1.30 वाजता चेन्नईमध्ये नाणेफेक होईल. 

हार्दिक पांड्या स्मिथपेक्षा वरचढ

हार्दिक पांड्या स्मिथपेक्षा वरचढ ठरला आहे. मागील 8 डावांपैकी पाच डावात स्मिथला हार्दिकने बाद केले आहे. 





चेपॉकवर गर्दी जमण्यास सुरुवात

शुभमन गिल पहिल्या सामन्याला मुकणार

चेन्नईच्या मैदानातही ऑस्ट्रेलिया वरचढ

चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. येथेही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. कांगारुंनी चेन्नईमध्ये दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एक सामना जिंकता आला आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत 70 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्याचा निकाल लागला नाही. भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.









न्यूट्रल ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 25 सामने झाले आहेत.  त्यामध्ये भारताने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. 


आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये  12 वेळा आमना सामना झाला आहे. त्यामध्ये भारताला फक्त चार सामन्यात विजय मिळाला, तर  8 सामन्यात कांगारुंनी बाजी मारली.

World Cup 2023 : ईशानला संधी ? चेन्नईत कांगारुंविरोधात भारताचे कोणते 11 शिलेदार उतरणार ?

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, अश्विन/शार्दूल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

कोण मारणार बाजी ?

कधी कुठे पाहाल सामना ?

फुकटात कुठे पाहाल सामना ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा शानदार सामना मोबईलवरही लाईव्ह पाहता येईल.  डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल. 


मोबाइलवर कुठे पाहाल सामना ?









रेडियोवर कुठे ऐकाल लाईव्ह कॉमेंट्री ?


विश्वचषकातील सामन्याचे लाई्ह कॉमेंट्री अथवा समालोचन ऐकायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रेडियोच्या डिजिटल चॅनल - इंडिया: प्रसार भारतीवर जावे लागेल. त्याशिवाय आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल ऑडियो पार्टनर डिजिटल 2 स्पोर्ट्स (Digital 2 Sports) वरही समालोचन ऐकू शकता. 


विश्वचषकाच्या बातम्या कुठे वाचाल - 
विश्वचषकाच्या बातम्या अथवा स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुम्हाला आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एबीपी माझाच्या https://marathi.abplive.com/   संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज सामना

ICC Cricket World Cup 2023 : रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महामुकाबला रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता लढतीला सुरुवात होणार आहे. त्याआधी नाणेफेक होईल. विश्वचषक विजयाच्या दावेदार असणाऱ्या दोन संघातील लढतीकडे सर्व क्रीडा चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना सर्वांना मोफत पाहता येणार आहे. 


भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल.

पार्श्वभूमी

India vs Australia Live Score, World Cup 2023 : विश्वचषक 2023 स्पर्धेतील (ODI World Cup 2023) टीम इंडियाच्या (Team India) मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. टीम इंडिया (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. या दिवसरात्र सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं दिले आहेत. अलिकडेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं 2-1 नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑसी टीमची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे.


भारतीय क्रिकेट संघानं शेवटचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले, पण टीम इंडियाचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. अशातच मायभूमीवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 12 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागलं असून हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याची मोहीम आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू होत आहे.


वर्ल्डकपमध्ये टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा
आज भारतीय क्रिकेट संघ पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा आजचा सामना विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 


भारतीय क्रिकेट संघानं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत कांगारूंपेक्षा भारतीय खेळाडूंचं मनोबल अधिक भक्कम असेल. सध्या भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला एकदिवसीय क्रिकेट संघ आहे. दरम्यान, आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईतील चेपॉकवर परदेशी संघानं सामने जिंकणं अशक्य असल्याचं बोललं जातं. 


विश्वचषकातील पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेईंग 11? 
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्ससाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात तीन स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. म्हणजेच, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत आर अश्विनही प्लेइंग-11 मध्ये असू शकतो. 


टीम इंडिया (संभाव्य प्लेईंग-11)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 


ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेईंग-11)
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.