Novak Djokovic, US Open 2022 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) वर्षातील अखेर्चाय ग्रँड स्लॅम स्पर्धेतून अर्थात यूएस ओपन 2022 मधून (US Open 2022) माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. स्पर्धा होणाऱ्या न्यूयॉर्कमध्ये पोहोचणं शक्य नसल्याचं सांगत नोवाकने माघार घेतली आहे. तसंच आपल्या चाहत्यांना त्यांनी दाखवलेल्या सपोर्ट आणि प्रेमासाठी धन्यवाद देखील मानले आहेत. तसंच लवकरच कोर्टावर परतू असंही त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


नेमकं काय आहे ट्वीट?


दुर्दैवाने, यूएस ओपनसाठी मी यावेळी न्यूयॉर्कला प्रवास करू शकणार नाही. तुमच्या प्रेम आणि समर्थनाच्या संदेशांसाठी #NoleFam धन्यवाद. माझ्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा! मी चांगल्या स्थितीत आणि सकारात्मक भावनेत राहीन आणि पुन्हा स्पर्धेत खेळण्याच्या संधीची वाट पाहीन. लवकरच भेटू टेनिस जगतात!






नोवाकचा कोरोना लशीला विरोध


अमेरिकेतील कोरोना निर्बंधांनुसार, यूस ओपन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक होतं. पण जोकोविचनं अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नव्हती. यामुळं त्याला या स्पर्धेला मुकावं लागणार होतं. पण आता नव्या गाईडलाईन्सनुसार लशीची अनिवार्यता काढण्यात आली होती. त्यामुळे नोवाक स्पर्धेत सहभाग घेईल असं वाटत होतं. पण त्याने स्पर्धेला काही वेळच शिल्लक असताना आता माघार घेतल्याने टेनिस जगतात खळबळ उडाली आहे. याआधी कोरोना लशीला विरोधामुळं नोवाकला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतही खेळण्याची परवागनी मिळाली नव्हती. 


विम्बल्डन स्पर्धेत जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी
विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं  होतं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केलाय. तसेच त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. या कामगिरीसह त्यानं रॉजर फेडररला मागे टाकलं आहे.


हे देखील वाचा-