New York Fire :  न्यूयॉर्कमधील ब्रोन्क्स येथील एका अपार्टमेंटला काल (9 जानेवारी)भीषण आग लागली. या घटनेत 19  जणांचा मृत्यू झाला आहे.  19 मधील 9  ही लहान मुलं आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे.


मेयर एरिक एडम्स यांनी दिली माहिती


सीएनएनच्या रिपोर्टनुसार मेयर एरिक एडम्स यांनी सांगितले की 32 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही घटना ब्रोन्क्स जूच्या पश्चिम भागात असणाऱ्या 19 मजल्यांच्या इमारतीत लागली. इमारतीला ही आग 11 वाजता लागली त्यानंतर हळू हळू ही आग  दूसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला देखील लागली.  


एएफपी यांच्या रिपोर्टनुसार इमारतीच्या जवळ राहणाऱ्या जॉर्ज किंग यांनी सांगितले  की,  'मी इथे गेली 15 वर्ष राहात आहे. अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली. मी त्या इमारतीमधून धूर बाहेर येताना पाहिला. त्या इमारतीमधील अनेक लोक मदत मागत होते. लोक खिडकीमधून हात बाहेर काढून मदत मागण्याचा प्रयत्न करत होते.' या घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. 


 न्यूयॉर्क सिटीचे फायर डिपार्टमेंटचे कमिश्नर डेनियल निग्रो  यांनी सांगितले की, आग कशी लागली? याबाबत आता तपास सुरू करण्यात आला आहे. इमारतीमधील दूसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील असणाऱ्या ड्यूप्लेक्स अपार्टमेंटमधून आग पसरली.


महत्वाच्या  बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha