Lausanne Diamond League : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दुखापतीमुळं मागील काही दिवसांपासून विश्रांतीवर आहे. नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला देखील तो खेळू शकला नव्हता. त्याच्या दुखापतीची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता (Rajeev Mehta) यांनी दिली होती. पण आता नीरजने स्वत: माहिती देत तो लवकच भालाफेकीसाठी ट्रॅकवर उतरणार आहे. शुक्रवारी नीरज स्वित्झर्लंडच्या लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League) मैदानात उतरणार आहे. त्याने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.






दुखापतीमुळं मुकला कॉमनवेल्थ स्पर्धेला


भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्यानं त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही.


वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरज चोप्राची दमदार कामगिरी


वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेतील अंतिम फेरीतील अखेरच्या प्रयत्नांत नीरज चोप्रानं यश मोठं मिळवत भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 90.54 मीटर (सर्वोत्तम) अशी कामगिरी नोंदवली. तर, चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब व्हॅडलेचनं 88. 09 मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावलंय. 


कॉमनवेल्थमध्ये भारताला 61 पदकं


जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा ज्याला इंग्रंजीत कॉमनवेल्थ गेम्स असं म्हटलं जातं.1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. 2010 साली तर 101 पदकांसह भारताने दुसरं स्थान पटकावलं होतं. यंदा 61 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानी राहिला. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यंदा शूटींग स्पर्धा नसल्याने यंदा भारताने सर्वाधिक पदकं कुस्तीमध्ये जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी उल्लेखणीय होती


हे देखील वाचा-