कधी 200 रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा 'हा' खेळाडू आता टीम इंडियाकडून खेळणार

नवदीप आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरकडून खेळतो. रणजी ट्रॉफी आणि आयपीएल 2019 मधील चांगल्या प्रदर्शनामुळे नवदीप भारतीय संघात संधी मिळाली आहे.

Continues below advertisement

मुंबई : विश्वचषकातील पराभव विसरुन टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड समितीने काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. जलद गोलंदाज नवदीप सैनी देखील वेस्ट इंडीज दौऱ्यात टीम इंडियाचा भाग असणार आहे.

Continues below advertisement

नवदीप आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरकडून खेळतो. रणजी ट्रॉफी आणि आयपीएल 2019 मधील चांगल्या प्रदर्शनामुळे नवदीपला भारतीय संघात संधी मिळाली.

200 रुपयात खेळायचा सामना

नवदीपला क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात मोठा स्ट्रगल करावा लागला. नवदीप सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. त्यावेळी तो अवघ्या 200 रुपयात कोणत्याही संघाकडून खेळायचा. नवदीप आयपीएल 2017 मध्ये दिल्ली संघात होता, मात्र त्याला फार संधी मिळाली नाही. त्यानंतर तो आरसीबीकडून खेळू लागला.

रणजी ट्रॉफी 2017-18 आणि विजय हजारे ट्रॉफी 2018-19 मध्ये सर्वाधिक विकेट

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी मिळते. नवदीप सैनीसोबतही तसंच झालं. 2017-18 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना नवदीपने 8 सामन्यत 34 विकेट घेतल्या होत्या. तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये नवदीपने 8 सामन्यात 16 विकेट घेतल्या.

गौतम गंभीरकडून मदत

नवदीपने डोमेस्टिक क्रिकेटला सुरुवात केली त्यावेळी गौतम गंभीर दिल्ली संघाचा कर्णधार होता. नवदीपला गंभीरची साथ मिळाली. गंभीरने नवदीपला वेळोवेळी संघात संधी दिली. "माझ्या करियरच्या यशात गौतम गंभीरचा मोठा वाटा आहे. मी काहीच नव्हतो त्यावेळी गौतम गंभीरने मला मदत केली, अशी प्रतिक्रिया 2017-18 च्या रणजीच्या उपांत्य सामन्यातील विजयानंतर नवदीपने दिली होती. त्यामुळे गौतम गंभीरमुळेच भारतीय संघाला नवीन जलद गोलंदाज मिळाला आहे, असं म्हणावं लागेल.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola