National Sports Day 2023 : आज 29 ऑगस्ट म्हणजेच 'राष्ट्रीय क्रीडा दिन'. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. 


29 ऑगस्ट आणि राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) :


हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 आणि 1936) नोंदवली आहे. अनेक दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिवशी शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्थांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवशी क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह प्रमुख क्रीडा संबंधित पुरस्कार प्रदान करतात. 


बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीसंघाचे नेतृत्व


हॉकीतील लक्षवेधी कामगिरीनंतर ध्यानचंद यांना 1927 मध्ये 'लांन्स नायक' पदावर बढती देण्यात आली. 1932 मध्ये नायक आणि 1936 मध्ये सुभेदार असे प्रमोशन त्यांना मिळत गेले. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा असे वर्णनही ऐकायला मिळते. मेजर ध्यानचंद यांनी 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केल होते.


खेलरत्न पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार'


भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असं असणार आहे. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांच्याच कार्याच्या स्मरणार्थ आजचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. 


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी