National Games 2022 Records : गुजरातमध्ये सुरु 36 व्या नॅशनल गेम्स (Natinal Games 2022) अर्थात राष्ट्रीय खेळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोसी मीना पॉलराज (Rosy Meena Paulraj) या खेळाडूने महिलांच्या पोल वॉल्ट खेळात (Womens Pole Vault) 4.20 मीटरची उडी घेत नवा नॅशनल रेकॉर्ड केला आहे. 25 वर्षीय या महिला खेळाडूने  2014 मध्ये व्ही सुरेखाने सेट केलेल्या 4.15 मीटरच्या रेकॉर्डला तोडत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड सेट केला आहे.

पॉलराज हिने 2022 च्या फेडरेशन चषकात सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदा आपली छाप पाडली होती. नॅशनल गेम्समधील आजच्या कामगिरीपूर्वी तिचा वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड 4.00 मीटर होता. ज्यानंतर आता तो 4.20 मीटर झाला आहे. 

नॅशनल गेम्स 2022 खेळांचे उर्वरीत वेळापत्रक - 

29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: नेमबाजी (रायफल आणि पिस्तूल)30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर: शूटिंग (शॉटगन)30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: कुस्ती30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: ट्रायथलॉन30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर: तिरंदाजी30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर : खो-खो26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: लॉन बाउल29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर: टेनिस30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटबोर्डिंग30 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटिंग30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: कुंपण घालणे30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: जिम्नॅस्टिक्स30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: वेटलिफ्टिंग30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: ऍथलेटिक्स30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: रोइंग1 ते 10 ऑक्टोबर: फुटबॉल (महिला)1 ते 4 ऑक्टोबर: सायकलिंग (ट्रॅक)1 ते 5 ऑक्टोबर: स्क्वॉश1 ते 6 ऑक्टोबर: बॅडमिंटनऑक्टोबर 1 ते 3: बास्केटबॉल 3×3ऑक्टोबर 1 ते 6: बास्केटबॉल 5×5ऑक्टोबर 2 ते 11: फुटबॉल (पुरुष)2 ते 8 ऑक्टोबर: अॅक्वेटिक्स2 ते 9 ऑक्टोबर: हॉकी5 ते 12 ऑक्टोबर: बॉक्सिंग6 ते 11 ऑक्टोबर : योगासन6 ते 9 ऑक्टोबर: गोल्फ7 ते 11 ऑक्टोबर : मल्लखांब7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्ट टेनिस7 ते 11 ऑक्टोबर: ज्युडो8 आणि 9 ऑक्टोबर: सायकलिंग (रस्ता)8 ते 11 ऑक्टोबर : वुशु10 आणि 11 ऑक्टोबर: कॅनोइंग7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्टबॉल6 ते 9 ऑक्टोबर: बीच व्हॉलीबॉल8 ते 12 ऑक्टोबर: व्हॉलीबॉल

कधी, कुठे पाहाल नॅशनल गेम्सचे सामने?

नॅशनल गेम्स 2022 स्पर्धा गुजरातमध्ये पार पडणार आहेत. यावेळी गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये स्पर्धा होणार आहेत. सायकलिंग स्पर्धांसाठी नवी दिल्ली येथील इंदीरा गांधी स्टेडियममध्ये ट्रॅक असल्याने सायकलिंग इव्हेंट नवी दिल्ली येथे होईल. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्सवर होणार असून प्रसार भारती स्पोर्ट्सच्या युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

हे देखील वाचा-