National Games 2022 Schedule : यंदा 36 व्या नॅशनल गेम्स (Natinal Games 2022) अर्थात राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 गुजरातच्या भूमीत पार पडत आहेत. जवळपास 7 वर्षानंतर पुन्हा एकदा होऊ घातलेल्या या स्पर्धांमध्ये देशभरातून जवळपास 7000 स्पर्धक सहभागी होत असून 36 प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू मैदानात उतरताना दिसणार आहेत. 36 वे नॅशनल गेम्स 2016 मध्ये गोवा येथे पार पडणार होते, पण काही कारणांनी पुढे ढकललेल्या स्पर्धा मग कोरोनामुळे आणखी पुढे ढकलल्या गेल्या. ज्यानंतर यंदा गुजरातमध्ये स्पर्धा पार पडत आहेत.
नॅशनल गेम्सचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालं. त्याआधी म्हणजेच 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान टेबल टेनिस स्पर्धांनी या खेळांची सुरुवात झाली होती. आता 12 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धाचं नेमकं वेळापत्रक पाहूया...
नॅशनल गेम्स 2022 खेळांचे वेळापत्रक -
20 ते 24 सप्टेंबर: टेबल टेनिस
26 सप्टेंबर ते ऑक्टोबर: कबड्डी
26 ते 30 सप्टेंबर: नेटबॉल
28 ते 30 सप्टेंबर: रग्बी
29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: नेमबाजी (रायफल आणि पिस्तूल)
30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर: शूटिंग (शॉटगन)
30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: कुस्ती
30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: ट्रायथलॉन
30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर: तिरंदाजी
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर : खो-खो
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: लॉन बाउल
29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर: टेनिस
30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटबोर्डिंग
30 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटिंग
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: कुंपण घालणे
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: जिम्नॅस्टिक्स
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: वेटलिफ्टिंग
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: ऍथलेटिक्स
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: रोइंग
1 ते 10 ऑक्टोबर: फुटबॉल (महिला)
1 ते 4 ऑक्टोबर: सायकलिंग (ट्रॅक)
1 ते 5 ऑक्टोबर: स्क्वॉश
1 ते 6 ऑक्टोबर: बॅडमिंटन
ऑक्टोबर 1 ते 3: बास्केटबॉल 3×3
ऑक्टोबर 1 ते 6: बास्केटबॉल 5×5
ऑक्टोबर 2 ते 11: फुटबॉल (पुरुष)
2 ते 8 ऑक्टोबर: अॅक्वेटिक्स
2 ते 9 ऑक्टोबर: हॉकी
5 ते 12 ऑक्टोबर: बॉक्सिंग
6 ते 11 ऑक्टोबर : योगासन
6 ते 9 ऑक्टोबर: गोल्फ
7 ते 11 ऑक्टोबर : मल्लखांब
7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्ट टेनिस
7 ते 11 ऑक्टोबर: ज्युडो
8 आणि 9 ऑक्टोबर: सायकलिंग (रस्ता)
8 ते 11 ऑक्टोबर : वुशु
10 आणि 11 ऑक्टोबर: कॅनोइंग
7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्टबॉल
6 ते 9 ऑक्टोबर: बीच व्हॉलीबॉल
8 ते 12 ऑक्टोबर: व्हॉलीबॉल
कधी, कुठे पाहाल?
नॅशनल गेम्स 2022 स्पर्धा गुजरातमध्ये पार पडणार आहेत. यावेळी गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये स्पर्धा होणार आहेत. सायकलिंग स्पर्धांसाठी नवी दिल्ली येथील इंदीरा गांधी स्टेडियममध्ये ट्रॅक असल्याने सायकलिंग इव्हेंट नवी दिल्ली येथे होईल. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन स्पोर्ट्सवर होणार असून प्रसार भारती स्पोर्ट्सच्या युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
हे देखील वाचा-
- National Games 2022 : ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गाजवल्यानंतर आता नॅशनल गेम्समध्येही मीराबाईची कमाल, सुवर्णपदकाला गवसणी
- National Games 2022 : महाराष्ट्राचं सुवर्णपदकाचं खातं उघडलं, पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध