MI vs RCB : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या चौदाव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. बंगळुरूने मुंबईवर दोन विकेट्ने मात केली. बंगळुरुच्या विजयात हर्षल पटेलनं महत्त्वाची कामगिरी बजावली असून  शेवटच्या चेंडूवर बंगळूरुने विजय मिळवला आहे. 


या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं एक परंपरा मात्र कायम ठेवली. ती परंपरा म्हणजे सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची. गेल्या सलग नऊ आयपीएल सिझनमध्ये मुंबईचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे.


2013 साली RCB विरोधात, 2014 साली KKR, 2015 साली पुन्हा KKR, 2016 साली RPS, 2017 साली पुन्हा RPS, 2018 साली CSK, 2019 साली DC, 2020 साली CSK तर आजच्या सामन्यात पुन्हा एकदा बंगळूरुकडून पराभवाच्या सामना सलामीच्या लढतीत मुंबईला स्वीकारावा लागला आहे.


बंगळुरुकडून हर्षल पटेलनं  5 विकेट्स घेतल्या


सलामीच्या सामन्यात मुंबईचं बंगलोरसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सनं 9 विकेट्स गमावत 159 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सलामीवीर ख्रिस लीननं सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांच्या उपयुक्त खेळीमुळं संघाची धावसंख्या पर्यंत पोहोचली. मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ गतीनं झाली. कर्णधार रोहित शर्मानं चांगली सुरुवात केली मात्र 19 धावांवर तो धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं शानदार 31 धावांची खेळी केली. ख्रिस लीनचं अर्धशतक एका धावेनं हुकलं. त्याला वॉशिंग्टननं 49 धावांवर बाद केलं. त्यानंतर ईशान किशननं 19 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला क्रुणाल पांड्यानं क्रुणालनं 07 धावा केल्या. तर पोलार्डनं 07 धावा केल्या. बंगळुरुकडून हर्षल पटेलनं शानदान गोलंदाजी केली. त्यानं 5 विकेट्स घेतल्या. दोन तर जॅमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरनं 1-1 विकेट घेतली.