BCCI New Title Sponsor : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) टायटल स्पॉन्सरशिप पेटीएमकडून (PayTm) मास्टरकार्डकडे (Mastercard) देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसह (International Matches) डॉमेस्टीक सामन्यांना देखील टायटल स्पॉन्सर मास्टरकार्ड (Mastercard) असणार आहे. डिजीटल पेमेंट कंपनी पेटीएमने बीसीसीआयने (BCCI) आपली पेटीएमसोबतटी डील संपवण्याचा निर्णय़ घेतला असून बीसीसीआयनेही याला मंजूरी दिली आहे.
आता मास्टरकार्ड बीसीसीआयचा टायटल स्पॉन्सर
आता बीसीसीयने आपला स्पॉन्सर बदलला असल्याने मास्टरकार्ड भारतीय संघाच्या सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सर असणार आहे. आता भारतीय क्रिकेट टीम सप्टेंबरच्या पूर्वी भारतीय भूमीत एकही सामना खेळणार नाही. सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणारा भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये टी20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत सामने खेळणार असून या सामन्यांपासून मास्टरकार्ड टायटल स्पॉन्सर असणार आहे.
एका सामन्याचे 3.8 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार
समोर येणाऱ्या माहितीनुसार याच वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेटीएमने (PayTm) बीसीसीआयकडे (BCCI) टायटल स्पॉन्सरशिप पुढे न वाढवण्याची मागणी केली होती. पेटीएमनेच हे अधिकार मास्टरकार्डला (Mastercard) देण्याबाबतही यावेळी बीसीसीआयला सल्ला दिला. दरम्यान या करारानंतर आता मास्टरकार्डकडून बीसीसीआयला भारताच्या एका सामन्यानंतर जवळपास 3.8 कोटी रुपये मिळणार आहेत.
स्वांतत्र्यदिनानिमित्त BCCI खास सामना खेळवण्याच्या तयारीत
यंदा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार असल्याने देशभरात जंगी सेलिब्रेशन होणार यात शंका नाही. अशामध्ये क्रिकेटप्रेमींसाठीही एक खास पर्वणी मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून बीसीसीआयला एक खास प्रपोजल पाठवण्यात आलं आहे. ज्यानुसार भारतीय क्रिकेटर्स आणि जगातील अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू यांच्यात एक खास सामना खेळवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे India vs Rest of World असा एक खास सामना यंदा रंगण्याची शक्यता आहे. आझादी का अमृत महोत्सव (Aazadi Ka Amrut Mohostav) यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत यंदा 22 ऑगस्ट रोजी हा सामना घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा-