Asian Cup Table Tennis tournament: आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित मीमा इटोविरुद्ध पराभूत झाल्यानं मनिका बत्राचे (Manika Batra) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. महत्वाचं म्हणजे, आशियाई कप टेबल टेनिसमध्ये स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणारी ती पहिली महिला टेनिसपटू ठरलीय. कांस्यपदकाच्या लढतीत (Bronze Medal) तिनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू हिना हयातचा पराभव करत इतिहास रचलाय.


मनिका बत्रानं कांस्यपदकाच्या सामन्यात शानदार खेळ दाखवला. कांस्यपदकाच्या लढतीत तिनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची महिला टेबल टेनिसपटू हिना हयातला कोणतीही संधी दिली नाही आणि सामना 4-2 असा जिंकला. या विजयासह मनिका बत्रा आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ती सुवर्णपदकावर नाव कोरेल अशी सर्व भारतीयांची अपेक्षा होती.परंतु, उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला जपानच्या मीमा इटोनं पराभूत केलं.या पराभवासह बत्राचं सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 


ट्वीट-






 


आशियाई कप टेबल टेनिसमध्ये उपांत्य फेरी गाठणारी पहिली महिला
मनिका बत्रा ही आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली खेळाडू ठरली आहे. मनिकानं उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत 23व्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या चेन हसू यू हिच्यावर शानदार विजय नोंदवला होता. मनिकानं हा सामना 6-11, 11-6, 11-5, 11-7, 8-11, 9-11, 11-9 असा जिंकला. 


शरथ कमल आणि जी साथियानची कामगिरी
39 वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात शरथ कमलनं 2015 मध्ये सहावं आणि जी साथियाननं 2019 मध्ये सहावं स्थान पटकावलं होतं. जागतिक क्रमवारी आणि पात्रतेच्या आधारावर आशियातील टॉप 16-16 पॅडलर्स स्पर्धेत खेळतात.


हे देखील वाचा-