David Warner on Ganesha Chaturthi 2022: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक खास दिवशी तो त्याच्या भारतीय चाहत्यांसाठी काही खास पोस्ट शेअर करतो. भारतीय चित्रपट, गाणी, खाद्यपदार्थ, कपडे इत्यादींशी संबंधित त्यानं अनेक पोस्ट केल्या आहेत. भारतीय चाहत्यांनाही त्याच्या पोस्टला खूप पसंदी दर्शवली जाते. आज गणेश चतुर्थीच्या दिवशीही वॉर्नरनं अशीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात तो श्री गणेशासमोर हात जोडताना दिसतोय. या फोटोसोबतच त्यानं गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वॉर्नरनं लिहिलंय की, "भारतात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा." 

वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट-

 

वॉर्नरच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
वॉर्नरच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा महापूर आलाय. या पोस्टला आतापर्यंत 13 लाखांहून अधिक युजर्सनी लाईक्स केलंय. त्यावर 30 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. अनेक चाहते त्याला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही देत आहेत. 

वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

क्रिकेट सामना डाव धावा सर्वोच्च धावसंख्या सरासरी स्ट्राईक रेट शतक अर्धशतक चौकार षटकार झेल
कसोटी 96 176 7817 335* 46.52 71.29 24 34 926 62 77
एकदिवसीय 135 133 5680 179 44.72 95.12 18 25 601 86 60
टी-20 91 91 2684 100* 33.55 140.89 1 22 268 100 50

हे देखील वाचा-