Malaysia Open 2022 : दोन वेळा भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) नुकतीच मलेशिया ओपनच्या (Malaysia Open 2022) उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली आहे. चीनच्या ताय त्झू यिंगने (Tai Tzu Ying) सिंधूला पराभूत करत स्पर्धेबाहेर केल्यामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 55 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सिंधू 13-21, 21-12, 12-21 च्या फरकाने पराभूत झाली.
याच स्पर्धेत याआधी पीव्ही सिंधूनं थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानचा (phittayaporn chaiwan) पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक घेतली होती. तिने फिट्टायापोर्न चायवानचा 19-21, 21-9, 21-14 च्या फरकाने पराभव केला होता. पण आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधू पराभूत झाल्याने ती उपांत्य फेरीत पोहचू शकलेली नाही. उपांत्य पूर्व फेरीच्या या महत्तपूर्ण सामन्यात पहिल्या सेटमध्ये यिंगने दमदार खेळ दाखवला. आधीपासून चांगले पॉईंट्स जमवत ती थेट 13-21 अशा मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पुनरागमन केलं आणि 21-12 च्या फरकाने सिंधूने सेट जिंकला. ज्यानंतर अखेरचा आणि निर्णायक सेट कोण जिंकेल? याकडे सर्वांचे लक्ष्य होते. पण हा सेट 21-14 च्या फरकाने यिंगने जिंकत सामनाही नावे केला.
यिंग सिंधूवर कायम भारी
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला याच यिंगने पराभूत केलं. ज्यामुळे यिंगला रौप्य पदक मिळालं, तर सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आताही यिंगमुळे सिंधूचं मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. आतापर्यंत सिंधू आणि यिंग यांच्यात झालेल्या सामन्यात यिंगचच पारडं जड राहिलं असून तिने 16 सामने जिंकले असून सिंधूने केवळ 5 सामने जिंकले आहेत. 2019 नंतर एकदाही सिंधूला तिला मात देता आलेली नाही.
हे देखील वाचा-
- Watch Video : ...म्हणून भुवनेश्वर कुमार भारताचा 'स्विंगमास्टर', भुवीने बटलरची विकेट घेतलेली डिलेव्हरी पाहिलीत का?
- IND vs ENG: दुसऱ्या टी-20 मध्ये कोहली, पंत, बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन; कोणत्या खेळाडूंचा पत्ता होणार कट?
- Arshdeep Singh: यालाचं म्हणतात संधीचं सोनं करणं, पदार्पणाच्या सामन्यात अर्शदीप सिंहची चमकदार कामगिरी