IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने 50 धावांनी विजय मिळवला. यावेळी भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. हार्दिकने 50 धावा करत 4 विकेटही घेतल्या. पण अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) केवळ एकच विकेट घेतली असली तरी ती विकेट अत्यंत महत्त्वाच्या खेळाडूची असून विकेट घेतली ही अत्यंत दमदार पद्धतीने...


सामन्यातील पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने इंग्लंडचा टी-20 कर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) त्रिफळाचीत केलं. भुवीने शून्य धावांवर जोसला तंबूत धाडलं. विशेष म्हणजे यावेळी भुवनेश्वरने एक अप्रतिम अशी स्विंग डिलेव्हरी टाकत बटलरची दांडी उडवली. दरम्यान ज्या प्रकारे भुवनेश्वरने फेकलेला बॉल स्विंग झाला, ते पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. या डिलेव्हरीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान भारतीय संघात भुवनेश्वरने फेकलेले बॉल सर्वाधिक स्विंग होत असल्यानेच त्याला स्विंगमास्टर म्हणतात. नुकत्याच फेकलेल्या डिलेव्हरीतून त्याने पुन्हा एकदा हे दाखवू दिलं.


पाहा व्हिडीओ- 






बटलरवर भुवनेश्वर भारी


आतापर्यंत टी20 सामन्यात भुवनेश्वर बटलरवर चांगलाच भारी पडला आहे. या सामन्यातही इंग्लंडच्या डावातील पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारनं जोस बटलरला शून्यावर बाद करून आपली दहशत कायम ठेवली. टी-20 क्रिकेटमध्ये जोस बटलरनं आतापर्यंत भुवनेश्वर कुमारचे 67 चेंडू खेळून 64 धावा केल्या आहेत. तर, चार वेळा विकेट्स गमावली आहे. 


हे देखील वाचा-