जमैका : लोकेश राहुलच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या जमैका कसोटीवर पकड आणखी मजबूत केली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 358 धावांची मजल मारली असून विंडीजवर 162 धावांची आघाडी घेतली आहे.

 

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे 42 आणि रिद्धिमान साहा 17 धावांवर खेळत होते.

 

त्याआधी लोकेश राहुलने त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं शतकं झळकावलं. राहुलने 303 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 158 धावांची खेळी उभारली. तर चेतेश्वर पुजारानं 46 आणि विराट कोहलीने 44 धावांची खेळी केली.

 

विंडीजकडून रोस्टन चेसने दोन विकेट्स काढल्या. तर शेनॉन गॅब्रिएल आणि देवेंद्र बिशू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तत्पूर्वी जमैका कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 196 धावांत गुंडाळला होता.