रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली.
दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावलं. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.
या कसोटी सामन्यात आणि मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जाडेजाला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या. मग भारताने 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 137 धावा केल्या, त्यामुळे भारताला विजयासाठी 106 धावांची गरज होती.
रहाणेच्या नेतृत्त्वात विजय
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय साजरा केला. टीम इंडियानं ही मालिकाही 2-1 अशी खिशात टाकून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.
चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलनं 76 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 51 धावांची खेळी रचली. तर रहाणेनं 27 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या.
संपूर्ण कसोटी मालिकेतील विक्रम
सर्वाधिक विकेट -
- रवींद्र जाडेजा - 25
- आर अश्विन - 21
- ओकिफ - 19
- लायन - 19
सर्वाधिक धावा
- स्टीव्ह स्मिथ - 499
- चेतेश्वर पुजारा - 405
- के एल राहुल - 393
भारतीय भूमीतील टीम इंडियाचे विजय
- वि. न्यूझीलंड : 3-0
- वि. इंग्लंड : 4-0
- वि. बांगलादेश : 1-0
- ऑस्ट्रेलिया : 2-1
- कसोटी खेळणाऱ्या सर्व नऊही देशांविरोधात कसोटी मालिका जिंकण्याऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर
- विराट कोहलीच्या नेतृत्त्वात सलग 7 कसोटी मालिका विजय
कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची कामगिरी करणार अजिंक्य रहाणे नववा कर्णधार, तर पाचवा मुंबईकर. यापूर्वी उम्रीगर, सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली होती.
LIVE UPDATE
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सलग दोन सिक्सर ठोकत, अजिंक्य रहाणेने विजयाच्या दिशेने वेगाने आगेकूच केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर के एल राहुल टिच्चून फलंदाजी करत असून, त्याच्या जोडीला कर्णधार अजिंक्य रहाणे आला आहे.
एक चोरटी धाव घेण्याच्या नादात चेतेश्वर पुजारा शून्यावर धावबाद झाला. ग्लेन मॅक्स्वेलने अप्रतिम फिल्डिंग करत, त्याला धावबाद केलं.
त्याआधी सलामीवीर मुरली विजयला पॅट कमिन्सने विकेटकिपर मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केलं. विजयने 8 धावा केल्या.
भारताने आज बिनबाद 19 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र संघाची धावसंख्या 46 झाली असताना आधी विजय मग पुजारा दोघेही माघारी परतले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ
उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 137 धावांत गुंडाळून टीम इंडियाला धर्मशाला कसोटीसह चार कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकण्याची संधी मिळवून दिली.
या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं अजिंक्य रहाणे आणि त्याच्या शिलेदारांसमोर ही कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी अवघ्या 106 धावांचं आव्हान आहे.
संबधित बातम्या
INDvsAUS: भारताला विजयासाठी दोन दिवसात 87 धावांची गरज