Messi Leaves Barcelona : दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लब यांचा प्रवास आता संपला आहे. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं बार्सिलोनाची साथ सोडली. बार्सिलोना क्लबला निरोप देताना मेस्सीला मात्र अश्रू अनावर झाले होते. यावेळी मेस्सीच्या पत्नीनं अश्रू पुसण्यासाठी त्याला टिश्यूपेपर दिले होते. याच टिश्यू पेपरची किंमत आता साडेसात कोटी रुपये झाली आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलंत.... साडेसात कोटी रुपये. 


मेस्सीला निरोप देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं बार्सिलोनाची साथ सोडली. यावेळी बोलताना मेस्सीला अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी मेस्सीच्या पत्नीनं त्याला टिश्यू पेपर दिले. मेस्सीनं आपले डोळे पुसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर एका व्यक्तीनं ते टिश्यू पेपर गोळा केले आणि त्या व्यक्तीनं या टिश्यू पेपरची ऑनलाईन जाहीरात पोस्ट केली. तसेच योग्य ती किंमत आल्यात हा टिश्यू पेपर विकला जाईल, असं त्या व्यक्तीनं पोस्ट केलेल्या जाहीरातीत म्हटलं होतं. मर्काडो लिब्रे या वेबसाईटवर मेस्सीनं अश्रू पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू चाहत्यांना एक दशलक्ष डॉलर्स अर्थात, सुमारे साडेसात कोटी रुपयांमध्ये मिळू शकतो. 



दरम्यान, बार्सिलोनाचा स्टार फुटबॉरल लियोनेल मेस्सीनं तब्बल 21 वर्षांनी बार्सिलोनाची साथ सोडली. मेस्सीला निरोप देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत क्लब सोडल्याचं जाहीर करण्यात येणार होतं. परंतु त्या अगोदरच मेस्सी भावूक झाला आणि  मेस्सीला अश्रू अनावर झाले. 


अखेर मेस्सीनं सोडली बार्सिलोनाची साथ


मेस्सी वयाच्या सोळाव्या वर्षापासून बार्सिलोनासोबत जोडला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीचं बार्सिलोनासोबत असलेला करार 30 जून रोजी संपला. त्यानंतर आता मेस्सी दुसरा कोणताही क्लब जॉईन करु शकतो. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून मेस्सी बार्सिलोनासोबत आपला प्रवास सुरु ठेवणार असल्याचं बोललं जात होतं. पण, आता यासर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता मेस्सी बार्सिलोनाची साथ सोडली असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. एफसी बार्सिलोनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. बार्सिलोना स्पष्ट सांगितलं आहे की, आता लियोनेल मेस्सी बार्सिलोनासोबत खेळणार नाही.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :