नवी दिल्ली : दिग्गज फुटबॉल प्लेयर लियोनेल मेस्सीच्या नावावर आजापर्यंत अनेक विक्रम आहेत. अशातच मेस्सीने आणखी एका विक्रम आपल्या नावे केला आहे. लियोनेल मेस्सीने आपल्या प्रोफेशनल करिअरचा 700वा गोल केला आहे. फुटबॉलमधील प्रतिष्ठेच्या ला लीगा या स्पर्धेमध्ये भारतीय वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री बार्सिलोना आणि एटलेटिको मेड्रिडमध्ये फुबॉलचा सामना पार पडला. या सामन्यात मिळालेल्या पेनल्टीवर दणदणीत गोड डागत मेस्सीने आपल्या करिअरमधील 700वा गोल करत इतिहास रचला.
मेस्सीने 700व्या गोलसोबतच आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये एक नवा मैलाचा दगड मिळावला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिना आणि क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनाकडून खेळताना गोल डागत मेस्सी जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू ठरला आहे. मेस्सीने 24 जून रोजी आपला 33वा वाढदिवस साजरा केला. एटलेटिको मेड्रिडच्या विरोधात मंगळवारी रात्री पार पडलेल्या सामन्यात मेस्सीने 50व्या मिनिटांवर आपल्या संघाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. परंतु, सामना मात्र 2-2 अशा बरोबरीवर संपला.
700 गोलपर्यंत पोहोचण्यासाठी मेस्सीने 860 सामने खेळले आहेत. प्रोफेशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रियाच्या जोसेफ बीकनच्या नावे आहे. जोसेफने आपल्या कारकीर्दीत 805 गोल केले होते. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉल खेळाडू रोमारियो आणि फुटबॉल सम्राट पेले प्रोफेशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मेस्सीच्या पुढे आहे रोनाल्डो
हंगरीचा दिग्गज खेळाडू फ्रेंक पुस्कस आणि जर्मनीचा गार्ड मुलर 746 आणि 735 गोल केल्यामुळे यांचा प्रोफेशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील टॉप 5 खेळाडूंमध्ये समावेश होतो. मेस्सीची तुलना इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डसोबत अनेकदा करण्यात येते. सर्वाधिक गोल करणाऱ्यां खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो मेस्सीपेक्षा थोडा पुढे आहे. रोनाल्डोने आतापर्यंत आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये 725 गोल केले आहेत. दरम्यान, रोनाल्डोने प्रोफेशनल फुटबॉलमध्ये एक हजारांहून जास्त सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
रवींद्र जाडेजा भारताचा 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'; धोनी, कोहलीलाही टाकलं मागे
'2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स!', श्रीलंकन मंत्र्याचा आरोप, माजी कर्णधाराने केली चौकशीची मागणी
भारताला आजपर्यंत सौरव गांगुलीसारखा उत्तम कर्णधार लाभला नाही; शोएब अख्तरकडून कौतुक