Lionel Messi Joins PSG :  फुटबॉल  चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.  अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी आणि त्याच्या बार्सिलोना क्लबचा जुना साथीदार ब्राजीलियान नेमार ही सुपरहिट जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. कारण लिओनेल मेस्सीने फ्रेंच सॉकर क्लबच्या पॅरीस सेंट जर्मन (PSG) बरोबर एक करार केला आहे. या कराराची माहिती अद्याप समोर आली नाही, परंतु मेस्सी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, काही तासातच मेस्सी पॅरीसला पोहचणार आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा 34 वर्षीय मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं रविवारी ( 8 ऑगस्ट) बार्सिलोनाची साथ सोडली. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मेस्सी भावुक झाला होता. 


पीएसजी  (PSG) फ्रंटलाईन पहिल्यापासून ताकतवान आहे. यामध्ये बार्सिलोना टीमचा माजी खेळाडू नेमार आणि फ्रान्सचा युवा स्ट्राईकर किलीयन एम्बाप्पे असे दोन सर्वोत्कृष्ट स्ट्राइटर टीममध्ये आहे. त्यामध्ये आता मेस्सी देखील सहभागी होणार आहे. 


मेस्सीने 700व्या गोलसोबतच आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये एक नवा मैलाचा दगड मिळावला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिना आणि क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनाकडून खेळताना गोल डागत मेस्सी जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू ठरला आहे.मेस्सीची तुलना इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डसोबत अनेकदा करण्यात येते. फुटबॉलर लियोनेल मेस्सीने सहाव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्यां खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो मेस्सीपेक्षा थोडा पुढे आहे. रोनाल्डोने आतापर्यंत आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये 725 गोल केले आहेत. दरम्यान, रोनाल्डोने प्रोफेशनल फुटबॉलमध्ये एक हजारांहून जास्त सामने खेळले आहेत.


संबंधित बातम्या :


Messi Leaves Barcelona : लियोनेल मेस्सीचा बार्सिलोनासह 21 वर्षांचा प्रवास संपला, क्लबकडून घोषणा


Lionel Messi Update: बार्सिलोना क्लब सोडताना लियोनेल मेस्सी भावुक, पत्रकार परिषदेत अश्रू अनावर


मेस्सीने रचला इतिहास! ला लीगामध्ये डागला फ्रोफेशनल करियरमधला 700वा गोल