बर्थ डे स्पेशल : कांगारुंना धडकी भरवणारी लक्ष्मणची ती खेळी!
लक्ष्मणच्या या खेळीला जगातील महान खेळीपैकी एक मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात लक्ष्मणने 281 धावांची खेळी केली. तर द्रविडने 180 धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाजांनी देखील ऑस्ट्रेलियाची गोची केली आणि कांगारुंना केवळ 212 धावा गारद करत 171 धावांनी विजय साजरा केला.
'द वॉल' राहुल द्रविडने लक्ष्मणला साथ दिली. याच दमदार भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने 657 धावांची मजल मारली.
पहिल्या इनिंगमध्ये 274 धावांनी पिछाडीवर गेलेल्या टीम इंडियाचे खेळाडू दुसऱ्या इनिंगमध्येही सुरुवातीलाच तंबूत परतले. मात्र लक्ष्मणने भक्कमपणे बाजू सांभाळली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 445 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 171 धावांत तंबूत परतली. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरलेल्या लक्ष्मणने सर्व परिस्थितीच पालटून टाकली.
यामध्ये आजही लक्ष्मणची 2001 साली कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गावस्कर-बॉर्डर सीरिजमध्ये खेळलेली खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे.
लक्ष्मणने अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून भूमिका निभावली. भारतीय संघाच्या अनेक ऐतिहासिक विजयात लक्ष्मणची मोलाची भूमिका आहे.
टीम इंडियाचा 'व्हेरी व्हेरी स्पेशल' अशी ओळख असलेला खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 43 वा वाढदिवस आहे. लक्ष्मणने कारकीर्दीमध्ये अशा काही इनिंग खेळल्या ज्या आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करुन आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -