रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली भारताची महिला पैलवान साक्षी मलिकला खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार हे निश्चित झालं आहे.

 

ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूला त्याच वर्षी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं साक्षी मलिक थेट खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे.

 

साक्षीला आजवरच्या कारकीर्दीत अजूनही अर्जुन क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं नाही. पण केंद्र सरकारचा धोरणात्मक निर्णय लक्षात घेता साक्षी आता थेट खेलरत्न पुरस्काराची मानकरी ठरणार आहे.

 

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्येच चौथ्या स्थानावर आलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि एअर पिस्टलच्या फायनलमध्ये धडक मारणारा नेमबाज जीतू राय यांच्या नावांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.