प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरून रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडू केवळ सेल्फी काढण्यासाठी जातात असे ट्विट केले होते. त्यावर अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.
आजच्या उपांत्य फेरीत पी.व्ही सिंधूने विजय मिळवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी, पी. व्ही सिंधू तुम्ही रिकाम्या हाताने नव्हेत तर पदक जिंकूनच मायदेशी परतणार आहात. आणि आम्ही तुमच्या सोबत 'सेल्फी' काढण्यास उत्सुक आहोत. असे ट्वीट केले आहे.
या शिवाय शोभा डे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करणारे ट्वीटदेखील अमिताभ बच्चन यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी, पी. व्ही. सिंधू तुम्ही बोलणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. कर्म बोलतात, आणि कधीकधी तर ते 'लेखणी'लाही पराभूत करतात, असे म्हटले आहे.
आणखी एका ट्वीटमध्ये बच्चन यांनी महिलाशक्तीचा काहींना अंदाज नसतो. पी. व्ही सिंधू तुम्ही टीकाकारांना उद्धवस्त केले आहे. असं म्हटलं आहे.