Khelo india : सध्या हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धा (Khelo India Youth Games) सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरु ठेवली असून कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांना देखील गवसणी घातली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खिशात घातली असून ही कामगिरी त्यांनी बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कब्बडी, सायकलिंग अशा विविध खेळांमध्ये केली आहे.


हरयाणाच्या ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राने आपला कमाल फॉर्म कायम ठेवला आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने तामिळनाडूच्या ऋत्विक संजीवला मात देत सुवर्णपदक मिळवलं. तर कब्बडीत मुलींच्या संघाला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी मिळवली असून मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळाले आहे. दुसरीकडे ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मंगेश ताकमोगेने आणि मुलींमध्ये पूजा दानोळेने याच प्रकारात रौप्य पदके पटकावली. याशिवाय अॅथलेटिक्समध्ये उंच उडीत-अनिकेत माने (2.07 मी., हरोली, कोल्हापूर) याने सुवर्ण पदक पटकावले. तर आर्यन पाटीलने (उत्तेखोल, रायगड) याच प्रकारात (2.04मी.) रौप्य जिंकले. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने 100 मीटर धावण्यात सुवर्ण कमाई केली. मुलींमध्ये याच प्रकारात वडगाव शेरीच्या (पुणे) अवंतिका नरळेने रौप्य पदकावर नाव कोरले.


कुस्तीतही कोल्हापूरची कमाल


या स्पर्धेत कुस्ती खेळामध्ये 51 किलो फ्री स्टाईलमध्ये कोल्हापूरच्या नरसिंग पाटीलने सुवर्ण तर कोल्हापूरच्याच रोहित पाटीलने रौप्य पदक मिळवलं. तर मुलींमध्ये 49 किलो गटात अहिल्या शिंदेने कांस्य पदक जिंकले. तर 65 किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलने सुवर्ण पदकावर नाव कोरलं. 71 किलो गटात कोल्हापूरच्याच संकेत पाटीलने कांस्यची कमाई केली.


हे देखील वाचा- 



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.