Maharashtra Won Junior National Carrom Championship : मैदानी खेळांशिवाय इनडोअर खेळांमध्ये कॅरम हा सर्वात  (Carrom) प्रसिद्ध आणि अनेकांच्याा आवडीचा खेळ. या खेळाच्या नुकत्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. मुंबईच्या दादर (Mumbai Dadar News) येथील स्काऊट हॉल येथे झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत आणि बँक ऑफ बरोडा आणि इंडियन ऑइल सहपुरस्कृत 47 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत (Junior National Carrom Championship) महाराष्ट्राच्या मुलांनी यश मिळवलं आहे.


18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) मुलांच्या संघाने विदर्भाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्राच्या मिहीर शेखने विदर्भच्या सुरज गायकवाडवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 17-5, 6-21 आणि 17-11 असा चुरशीचा विजय मिळवला. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या कौस्तुभ जागुष्ठेने विदर्भच्या ए. आय. यासिनला 21-5, 1-18 आणि 16-14 अशी मात दिली. दुहेरी लढतीत  महाराष्ट्राच्या अथर्व पाटील / एस. आर. रफिक जोडीने विदर्भच्या जी. समुद्रे / एस. रेहान जोडीला 18-2, 25-0 अशा फरकाने नमवत महाराष्ट्राच्या संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला.  


मुलींमध्ये महाराष्ट्र अंतिम लढतीत पराभूत


मुलींच्या सांघिक गटात बलाढ्य तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्रवर 3-0 असा (Maharashtra vs Telagana) विजय नोंदवून अंतिम विजेतेपद मिळविलं. तामिळनाडूच्या एच. आविष्काराने महाराष्ट्राच्या दीक्षा चव्हाणवर 18-3, 21-1 असा विजय नोंदवला. तर तामिळनाडूच्या एम. खझिमाने महाराष्ट्राच्या केशर निर्गुंवर 13-11, 21-0 अशी मात केली. दुहेरी लढतीत तामिळनाडूच्या वि मित्रा / सुपर्णा जोडीने महाराष्ट्राच्या श्रुती वेळेकर / ज्ञानेश्वरी इंगुळकरवर 24-0, 12-14  आणि 21-7 असा विजय मिळवून बाजी मारली. 


मुलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तामिळनाडूच्या संघाने उत्तर प्रदेश संघावर 3-0 असा विजय मिळवला. या सामन्यात लागलेले निकाल पुढीलप्रमाणे-


निकाल



  • के. नीरज  कुमार वि कृष्णा दयाळ यादव 21-0, 0-21, 21-0

  • ए. मुसरफ वि आदिल अहमद 21-0, 21-12

  • ए अब्दूर रहमान / एस परवेस  वि शुभम/ महम्मद शाहरुख 14-4, 21-5


मुलींच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तेलंगणाने गोव्याच्या संघावर 3-0 असा विजय मिळविला. या सामन्यात लागलेले निकाल पुढीलप्रमाणे-


निकाल



  • एन. कार्तिक वर्षा वि श्रीशा गावकर 21-0, 21-0

  • के. नंदिनी वि ख़ुशी गोसावी 21-5, 21-3 

  • साई कीर्थना/ आईनी रेड्डी वि इशा बोरकर / श्रुष्टी गोसावी 21-0, 21-4 


हे देखील वाचा-