John Cena's 20th anniversary: डब्लूडब्लूई सुपरस्टार जॉन सीनानं रिंगणातील 20 वर्षे पूर्ण केली आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच 20 वर्षांपूर्वी जॉन सीनानं डब्लूडब्लूईच्या रिंगणात पाय ठेवला होता. या 20 वर्षांमध्ये चाहत्यांचं खूप मनोरंजन करणाऱ्या जॉन सीना 16 वेळा चॅम्पियन ठरलाय. जॉन सीना जगभरातील लोकप्रिय डब्लूडब्लूई सुपरस्टार पैकी एक आहे. जगभरात त्याचे चाहते असून लोक त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत. डब्लूडब्लूईमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्यानंतर स्टेफनी मॅकमोहन, ट्रिपल एच, रॅंडी ऑर्टन, शॉन मायकेल्स, स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन आणि ट्रिश स्ट्रॅटस यांसारख्या अनेक दिग्गज सुपरस्टार्सनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
जॉन सेना काय म्हणाला?
जॉन सिनानं 25 व्या वर्षात डब्लूडब्लूईच्या रिंगणात एन्ट्री केली होती. आता तो 45 वर्षाचा आहे. तसेच तो क्वचितच रिंगमध्ये दिसतो. त्यानं बराच काळ एकही सामना जिंकलेला नाही. आता त्याचा बराचसा वेळ हॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगमध्ये घालवतो, पण जॉन सीनानं त्याच्या पुनरागमनाबद्दल मोठा खुलासा केलाय."डब्लूडब्लूईमध्ये 20 वर्षे पूर्ण केल्यावर मी रिंगमध्ये कधी परतणार हे मला स्वतःला माहीत नाही", असं म्हटलंय. पण त्यानं निवृत्तीबद्दलही काही म्हटलं नाही.
जॉन सीनाचा अखेचा सामना
जॉन सेनानं गेल्या वर्षी डब्लूडब्लूमधील शेवटचा सामना समर स्लॅम 2021 मध्ये युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी रोमन रेन्जविरुद्ध लढला. त्यानंतर तो 'मनी इन द बँक'मध्ये परतला आणि त्यानंतर तो समर स्लॅमपर्यंत नियमितपणे दिसला. मात्र, यादरम्यान त्याने टीव्हीवर फक्त एकच सामना लढवला आणि त्यातही त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. सीनाने गेल्या तीन वर्षांत एकही सामना जिंकलेला नाही.
हे देखील वाचा-