Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) आज म्हणजेच 4 मार्च रोजी संध्याकाळी सुरू होत आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत कारण हा महिला आयपीएलमधील पहिलाच सामना आहे. हा सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या सामन्याच्या सुरु होण्याच्या वेळेच काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सामना आता नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने म्हणजेच रात्री 8 वाजता सुरू होईल.
उद्घाटन समारंभ 6:25 वाजता
आजपासून महिला आयपीएल अर्थात महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सुरू होणार आहे. महिला IPL चा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. लीग सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा उद्घाटन सोहळा 6.25 वाजता सुरू होईल.
सामना 8 वाजता सुरू होणार
यापूर्वी महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार होता, मात्र आता सामना 8 वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक साडेसात वाजता होईल. महिला आयपीएलचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. सीझनच्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळाही ठेवण्यात आला आहे, जो संध्याकाळी 6.25 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये प्रवेश दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होईल. बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन या उद्घाटन सोहळ्यात दिसणार आहेत. तिथे गायक एपी ढिल्लॉन देखील याठिकाणी दिसणार आहे.
पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या या हंगामातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
हे देखील वाचा-