Irfan Pathan Birthday : क्रिकेटचं मैदान काय अन् दोन्ही देशांची सीमारेषा काय किंवा आपला हाॅकी असूदे भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि वैरी सुद्धा असलेल्या पाकिस्तानमध्ये नेहमीच 36 चा आकडा राहिला आहे. क्रिकेटचा सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो आणि सामन्याच्या नायकाला कोणत्याही चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त मान मिळतो. या यादीत नेहमीच इरफान पठाण अग्रभागी राहिला आहे. पाकिस्तानमध्येच जाऊन पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत पाकिस्तानात खळबळ उडवून दिली. आता तो कॉमेंट्री करत असताना पाकिस्तानवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही. इरफानच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, त्याने पाकिस्तानला केव्हा आणि कसे बरबाद केले ते जाणून घेऊया...






तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर खोड काढण्याचा प्रयत्न केला. यावर इरफान पठाणने सडेतोड उत्तर दिले आणि लिहिले की, तुमच्या आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आहोत आणि तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखात सुखी आहात. त्यामुळे आपलाच देश सुधारण्याकडे लक्ष नाही. यानंतर पाकिस्तान चांगलाच लाल झाला. 






11 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला, तेव्हा पठाणने ट्विट केले- खूप सन्नाटा पसरला आहे, शेजाऱ्यांनी टीव्हीसह मोबाईल फोन सुद्धा तोडल्याचे दिसते.


पाकिस्तानच्या पराभवावर रशीदसोबत डान्स केला, दिलेलं वचन पूर्ण केलं


अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले तेव्हा इरफान पठाण कॉमेंट्री करत होता. तोही मैदानावर उपस्थित होता आणि राशिद खान त्याच्या जवळ येताच दोघेही नाचू लागले. हा व्हिडिओ शेअर करताना पठाणने लिहिले की, राशिद खानने आपले वचन पूर्ण केले आणि मी माझे वचन पाळले, चांगले खेळ केलात मित्रांनो...






इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये, भारतीय युवा संघाने बलवान क्रिकेटपटूंनी भरलेल्या पाकिस्तानचा 128 धावांनी पराभव केला. हा पराभव त्याच्यासाठी लाजिरवाणा होता, कारण त्याच्या संघात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू होते, तर भारतीय संघ पूर्णपणे तरुण होता. यानंतर जेव्हा पाकिस्तानने भारताला हरवले तेव्हा त्याच्या चाहत्यांनी इरफान पठाणला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर इरफान पठाणने चोख प्रत्युत्तर दिले होते. 






ती हॅटट्रिक कोण विसरू शकेल?


पठाणने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत खळबळ उडवून दिली होती. सलमान बट्टला पहिला बळी, तर युनूस खानला दुसरा आणि युसूफला तिसरा बळी केला. विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी जावेद मियांदाद म्हणाले होते की, पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीत इरफान पठाणसारखे स्विंग गोलंदाज आहेत.