Indian Premier League 2023 : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात आज ईडन गार्डन्स मैदानावर सामना रंगणार आहे. हा सामना युजवेंद्र चहलसाठी महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यात एक विकेट घेतली तर चहलच्या नावावर मोठा विक्रम होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये चहल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. चहल आणि ब्राव्हो यांच्या नावावर 183 विकेट आहेत. चहल याने आज एक विकेट घेतली तर तो पहिल्या क्रमांकावर पोहचणार आहे.
युजवेंद्र चहल याने यंदाच्या हंगामात भेदक मारा केलाय. चहल फॉर्मात दिसतोय.. त्याने 11 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. चहलने दोन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आजच्या सामन्यात चहल एक विकेट घेऊन इतिहास रचू शकतो.
IPL इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -
ड्वेन ब्रावो - 183 विकेट (158 सामने)
युजवेंद्र चहल - 183 विकेट (141 सामने)
पीयूष चावला - 174 विकेट (175 सामने)
अमित मिश्रा - 172 विकेट (160 सामने)
रविचंद्रन अश्विन - 171 विकेट (192 सामने)
लसीथ मलिंगा - 170 विकेट (122 सामने )
भुवनेश्वर कुमार - 163 विकेट (156 सामने)
सुनील नारायण - 159 विकेट (158 सामने)
हरभजन सिंह - 150 विकेट (160 सामने)
रविंद्र जाडेजा - 148 विकेट (193 सामने)
आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट -
आयपीएलमध्ये चहल याने दमदार कामगिरी केली आहे. 142 सामन्यातील 141 डावात चहलच्या नावावर 183 विकेट आहेत. चहल याने सर्वाधिक विकेट आरसीबीसाठी घेतल्या आहेत. चहल याने 2014 ते 2021 या काळात त्याने आरसीबीसाठी खूप विकेट घेतल्यात. चहल याने आरसीबीसाठी 113 सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत. राजस्थान रॉयलमध्येही चहल याने तुफानी कामगिरी केली आहे. चहल याने 28 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.
संजू करणार पराक्रम -
युजवेंद्र चहल याच्याशिवाय राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आज मोठा विक्रम करणार आहे. सॅमसन आज 150 वा आयपीएल सामना खेळणार आहे. सॅमसन याने आजच्या सामन्यात 75 धावा चोपल्या तर तो सहा हजार धावा करणारा फलंदाज ठरेल. कोलकाता नाइट रायडर्सचा आंद्रे रसेल टी20 क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण करण्यापासून तीन विकेट दूर आहे.
आणखी वाचा :
IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती
IPL 2023 : पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार, ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर, पाहा कोण कोण आहेत दावेदार
IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय?
Glenn Maxwell : आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल लवकर होणार बाबा, पत्नीने इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती