Dhoni Met The Elephant Whisperers Team: क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) नुकतीच ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) च्या टीमची भेट घेतली आहे. 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीची दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विस,या डॉक्युमेंट्रीमधील बोमन आणि बेली यांची भेट महेंद्र सिंह धोनीनं घेतली. महेंद्र सिंह धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टीम चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंवर एम.एस. धोनी आणि 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्रीच्या टीमचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये धोनी हा 'द एलिफंट व्हिस्पर्स' च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. 'स्पेशल ओकेजन विथ स्पेशल पिपल' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
धोनीची मुलगी झिवानं देखील द एलिफंट विस्परर्सच्या टीमची भेट घेतली. यावेळी धोनीनं 'द एलिफंट विस्परर्स' च्या टीमला चेन्नई सुपर किंग्सची जर्सी गिफ्ट म्हणून दिली. 'द एलिफंट विस्परर्स'डॉक्युमेंट्री दिग्दर्शिका कार्तिकी गोंजाल्विसनं यावेळी ऑस्करची ट्रॉफी देखील सोबत आणली होती.
'द एलिफंट विस्परर्स' ही ऑस्कर विजेती डॉक्युमेंट्री 40 मिनिटांची आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकता. या डॉक्युमेंट्रीमध्ये तामिळनाडूतील एक कुटुंबाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हे कुटुंब हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमची भेट घेतली होती.
'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीसह 'हॉलआऊट', 'हाऊ डू यू मेजर अ इअर', 'द मार्था मिचेल इफेक्ट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' या माहितीपटांनादेखील 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या: