Glenn Maxwell : आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि पत्नी विनी रमन यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन होणार आहे. विनी रमन हिने इन्स्टाग्राम पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली. विनी रमन हिच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन सप्टेंबर 2023 मध्ये आई-बाबा होणार आहे.


ग्लेन मॅक्सवेल यंदा भन्नाट फॉर्मात आहे. आरसीबीला चेअर करण्यासाठी विनी रमन भारतात आलेली होती. पण ती ऑस्ट्रेलियाला माघारी परतली आहे. आज विनी रमन हिने इन्स्टाग्राम पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली.  


पाहा पोस्ट - 






ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांचे लग्न 2022 मध्ये झाले होते. विनी रमन मूळची भारतीय आहे... चेन्नई येथील राहणारी आहे. विनी रमन हिने पोस्टमध्ये म्हटलेय की,  माझ्या आणि ग्लेनच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे.  हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण आम्हाला माहित आहे की हा प्रवास सोपा नाही. मला माहित आहे की ते किती वेदनादायक असेल.


सार्वजनिक उद्यानात मॅक्सवेलनं विनीला केलं होतं प्रपोज
विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. मॅक्सवेलनं एकदा सांगितलं होतं की, विनीनेच त्याला मानसिक आरोग्याच्या समस्येवर मात करण्यास मदत केली. मानसिक आरोग्यामुळं मॅक्सवेलला मधल्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला. विनीनं एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. मॅक्सवेलनं तिला प्रपोज केलं होतं, असंही तिनं त्यावेळी सांगितलं होतं. मॅक्सवेलनं विनीला पोर्ट मेलबर्नजवळील एका सार्वजनिक उद्यानात प्रपोज केलं होतं. 


विनी रामन कोण आहे?
विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म 3 मार्च 1993 मध्ये ऑस्ट्रेलियातच झाला आहे. परंतु, विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले.  मॅक्सवेल आणि विनी रमन 2017 पासून एकमेकांना डेट करीत होते. 


आणखी वाचा :
IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती 


IPL 2023 : पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार, ऑरेंज कॅप या खेळाडूच्या डोक्यावर, पाहा कोण कोण आहेत दावेदार


IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय?