Most sixes in playoffs in the IPL : आयपीएल 2022 स्पर्धेतील साखळी सामने संपले असून आता प्लेऑफच्या लढतींना सुरुवात होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल चार संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. यामधील विजेता संघ थेट फायनलध्ये जाणार आहे. तर पराभूत झालेला संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहचणार आहे. आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो.. प्लेऑफमध्येही धावांचा पाऊस पडतो... पण कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारलेत माहितेय? जाणून घेऊयात आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू...


मुंबई आणि चेन्नई संघाने प्लेऑफचे सर्वाधिक सामने खेळले आहेत. प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा आणि षटकार याच संघाच्या खेळाडूंच्या नावावर असणार आहेत. होय... प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये चेन्नई आणि मुंबईच्या खेळाडूंचा समावेळ आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने प्लेऑफमध्ये आतापर्यंत 40 षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने प्लेऑफच्या लढतीत तब्बल 28 षटकार मारलेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा फिनिशर आणि अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा क्रमांक लागतो. कायरन पोलार्डने प्लेऑफच्या लढतीत 25 षटकार मारले आहेत.  चौथ्या क्रमांकावर शेन वॉटसन आहे. वॉटसन चेन्नईकडून खेळला आहे. वॅटसनने 20 षटकार लगावले आहेत. तर या यादीत पाचव्या क्रमांकावर ख्रिस गेलचा क्रमांक लागतो. युनिवर्स बॉल ख्रिस गेलने 18 षटकार लगावले आहेत. 


आजपासून प्लेऑफच्या लढतीला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि आरसीबी हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. या चार संघामधील एकाही खेळाडू अव्वल पाचमध्ये नाही.. आता नवीन खेळाडू सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे...


कोलकातामध्ये होणार प्लेऑफचे दोन सामने  -
पहिला प्लेऑफ सामना : कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये  24 मे रोजी सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर दोन मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर दोनमध्ये पोहचतो.  


दूसरा प्लेऑफ सामना : एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे.  25 मे रोजी हा सामना होणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे.  तर मुंबईच्या विजयानंतर आरसीबी चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे 25 मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे. 




 



प्लेऑफचं वेळापत्रक - 
क्वालिफायर 1:  गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाता
एलिमिनेटर:  लखनौ vs आरसीबी, 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद