RCB-W Trolled : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीचा सलग तिसरा पराभव झाला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. गुणतालिकेत आरसीबीची पाटी कोरीच राहिली आहे. पुरुष आयपीएलमध्येही आरसीबी संघाची स्थिती सारखीच असते.. त्यामुळे  परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन असे म्हणत काही नेटकऱ्यांनी आरसीबीला ट्रोल केलेय. तर आरसीबीचे काही चाहते संघाच्या सपोर्टसाठी आले आहेत. 


पहिल्या तिन्ही सामन्यात आरसीबीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. संघात एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज असताना आरसीबीला अद्याप विजय मिळवता आला नाही. कागदावर आरसीबीचा संघ बलाढ्य दिसतोय पण प्रत्यक्षात मैदानात विजय मिळत नाही. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. 


अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा हा पहिला विजय ठरला तर आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होय. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 201 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीचा संघ सहा बाद 190 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीकडून सोफी डिवायन हिने विस्फोटक खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.  तिसऱ्या पराभवानंतर आरीसीबीला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर आरसीबीची खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी मिम्स शेअर करत आरसीबीवर निशाणा साधलाय. IPL मधील पराभवाचा कोहलीचा वारसा आता स्मृती मानधनाकडे आला आहे का? असा प्रश्न पुन्हा नेटकऱ्यांनी उपस्थित केला. 


 


























































गुजरातने दिलेल्या 202 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली होती. स्मृती मंधाना आणि सोफी डिवायन यांनी 5.2 षटकात 54 धावांचा पाऊस पाडला होता. स्मृती 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि सोफी डिवायन यांनी डाव सावरला. पण मोक्याच्या क्षणी एलिसा पेरी बाद झाली. पेरीनं 32 धावांचं योगदान दिले.  एका बाजूला विकेट पडत असताना सोफीने दुसरी बाजू लावून धरली होती. सोफी डिवायन हिने 45 चंडूत 66 धावांची खेळी केली. त्याशइवाय हेथर नाईट हिने 11 चेंडूत 30 धावांची खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. ठरावीक अंतरावर विकेट्स पडल्यामुळे आरीसीबीला 202 धावांचा पल्ला पार करता आला नाही. गुजरातकडून अश्ले गार्डनेर हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.


आणखी वाचा :


आरसीबीचा सलग तिसरा पराभव, गुजरातने 11 धावांनी सामना जिंकला