Dinesh Karthik Tweet MI vs DC IPL 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबई- दिल्ली सामन्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चौथ्या संघाचं नाव स्पष्ट होणार आहे. आजचा हा सामना दिल्लीनं जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल. परंतु, मुंबईनं या सामन्यात विजय मिळवल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळेल. आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. यासामन्यापूर्वी बंगळुरूचे खेळाडू मुंबईच्या संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत. नुकताच दिनेश कार्तिकनं एक ट्विट केलं आहे. ज्यात तो मुंबईच्या जर्सीत दिसत आहे. 

मुंबई- दिल्ली सामन्यावर आरसीबीच्या चाहत्यांची नजरआरसीबीच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण संघाच्या नजरा या सामन्यावर असतील. मुबंई- दिल्ली सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकचं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होत आहे. कार्तिकनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला दिसत आहे. आज मुंबईला आरसीबीचा पूर्ण पाठिंबा असल्याचं कार्तिकच्या या पोस्टमधून स्पष्ट होत आहे.

दिनेश कार्तिकचं ट्वीट-

दिनेश कार्तिकचं काय म्हणतोय?हा फोटो ट्विट करत दिनेश कार्तिकनं कॅप्शनमध्ये "Found this in archives 🤞😛" असं लिहलं आहे. कार्तिकचे हे ट्विट काही तासांतच व्हायरल झालं. या ट्विटला जवळपास 5 हजारहून अधिक रिट्वीट करण्यात आलं आहे. आतापर्यंत 74 हजाराहून अधिक लोकांनी या ट्विटला लाईक केलं आहे.

आरसीबीने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. बंगळुरूचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. परंतु, आरसीबीचा रनरेट खराब आहे. यामुळं आज दिल्लीचा पराभव झाला तरच आरसीबीचं प्ले ऑफमधील स्थान निश्चित होईल. अन्यथा त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेलं.

हे देखील वाचा-